Analysis : नितीन गडकरींना नागपूरात जात फॅक्टरचा फटका बसला का?

Analysis : नितीन गडकरींना नागपूरात जात फॅक्टरचा फटका बसला का?

शेवटी गडकरींचं काम आणि त्यांची विकासाची प्रतिमा यामुळे सर्वच स्तरातून त्यांना मतदान झालं हेच स्पष्ट झालंय. पण हेवीवेट गडकरींविरुद्ध कडवी झुंझ दिली असं वातावरण निर्माण करण्यात मात्र नाना पटोले यशस्वी झाले.

  • Share this:

नागपूर 23 मे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूरातल्या लढतीने सर्व देशाचं लक्ष वेधून घेतलं. गडकरींच्या कामाचं देशपातळीवर कौतुक झाल्याने नागपूरात नेमकं काय चाललंय याची उत्सुकता देशपातळीवर होती. तर सर्वाधिक मताधिक्याने विजयी होऊ असं गडकरी ठामपणे सांगत होते. त्यांचेच शिष्य असलेल्या नाना पटोलेंनी मात्र वातावरण निर्मिती करत कडवी झुंझ दिल्याचं चित्र निर्माण केलं. त्यामुळेच सर्वत्र चर्चा आहे ती नागपूरात जात फॅक्टर यशस्वी ठरला का? याचीच

संघाचं मुख्यालय हे नागपूरात असल्याने आणि गडकरी हे संघाचे लाडके असल्याने नागपूरात नेमकं काय होईल यावर सगळ्यांचच बारकाईने लक्ष होतं. गडकरी हे 100 टक्के मोठ्या फरकाने विजयी होतील असंही बोललं जात होतं. मात्र नाना पटोलेंनी प्रचारात जातीचं कार्ड खेळल्याने गडकरींना निवडणूक कठिण आहे असं सोशल मीडियात वातावरण तयार केलं गेलं.

त्यामुळे नागपूर धोक्यात आहे अशीही हवा पसरविण्यात पटोले यशस्वी झाले. नागपूरात कुणबी मतदारांची संख्या मोठी असल्याने त्याचा परिणाम होईल असं बोललं जावू लागलं. मात्र कुठलाही फॅक्टर इथं चालणार नाही. लोक विकासालाच मतं देतील असं गडकरी ठामपणे सांगत होते. 2014 च्या निवडणुकीत गडकरींचा लीड पावणे तीन लाखांचा होता. यावेळी तो थोडा कमी होण्याची शक्यता आहे एवढाच फरक नाना पटोले मुळे पडला.

शेवटी गडकरींचं काम आणि त्यांची विकासाची प्रतिमा यामुळे सर्वच स्तरातून त्यांना मतदान झालं हेच स्पष्ट झालंय. पण हेवीवेट गडकरींविरुद्ध कडवी झुंझ दिली असं वातावरण निर्माण करण्यात मात्र नाना पटोले यशस्वी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या