Analysis : नवनीत राणा कौर यांच्या विजयाची ही आहेत महत्वाची कारणं!

नवनीत राणा कौर यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही त्यांनी आपला मतदारांशी असलेला संपर्क कधीच कमी होऊ दिला नाही.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 08:23 PM IST

Analysis : नवनीत राणा कौर यांच्या विजयाची ही आहेत महत्वाची कारणं!

संजय शेंडे, अमरावती 23 मे : विदर्भात लक्षवेधी ठरली ती अमरावती मतदारसंघातली निवडणूक. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्या नवनीत राणा कौर यांनी  युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाची उत्तम बांधणी करून त्यांनी हे यश मिळवलं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय.

नवनीत राणा कौर यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही त्यांनी आपल्या मतदारांशी असलेला संपर्क कधीच कमी होऊ दिला नाही. त्यांनी सातत्याने संपर्क तर ठेवलाच त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी त्या धावूनही गेल्या त्यामुळे मतदारांनी त्यांना यावेळी संधी दिली.

गेल्या पाच वर्षात त्यांनी 1 हजार 750 गावांना भेटी दिल्या. अडीच लाख महिलांशी थेट संपर्क साधल्याचं सांगितलं जातं. गेल्या पाच वर्षात नवनीत कौर राणा यांनी किमान दोन लाख महिलांशी सेल्फी काढला असंही सांगितलं जाते. नवनीत या तेलुगू अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे.

त्यामुळे महिलांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षणाची भावना होती. तब्बल 1 लाख महिलांचं मतदान त्यांना झालं असंही आता सांगितलं जात आहे. अमरावती हा संमिश्र मतदारसंघ आहे. अमरावती सारखा शहरी भाग तर मेळघाटासारखा आदिवासी भागही त्यात आहे.

त्यांच्या या कामामुळेच अमरावतीत वंचित फॅक्टर आणि मोदी फॅक्टरही चालला नाही. दलित, आदिवासी आणि मुस्लिमांनी त्यांना भरभरून मतं दिली असंही आता स्पष्ट झालंय. शिवसेनेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्याविषयी कमालीची नाराजीची भावना होती. त्याचा फायदाही नवनीत कौर यांना मिळाला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...