बाबांनो, तुमचं मत वाया जाऊ देऊ नका..एसटी कंडक्टरने हाती घेतली आगळीवेगळी मोहीम

बाबांनो, तुमचं मत वाया जाऊ देऊ नका..एसटी कंडक्टरने हाती घेतली आगळीवेगळी मोहीम

बस सुरू होण्यापूर्वी गोपाळ पाटील हे प्रवाशांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगतात. 'बाबांनो, तुमचं मत हे अतिशय महत्त्वाचं आहे. देशाचा लोकशाही घडवणारे तुमचं मत आहे. ते व्यर्थ जाऊ देऊ नका.' मतदानाचा आग्रह गोपाळ पाटील हे प्रत्येकाला करताना दिसत आहे.

  • Share this:

राजेश भागवत,जळगाव, 18 एप्रिल- सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे आपला पक्ष इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे मतदारांना पटवून देण्यासाठी पक्षा-पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र जळगावात मतदारांनी जागृत होऊन मतदान करावे, कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नये, यासाठी आता एसटीचे वाहक अर्थात कंडक्टर गोपाळ पाटील हे प्रवाशांचे प्रबोधन करताना दिसत आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत आणि सर्वच पक्ष आपापल्या परीने पक्षाचा प्रचार करताना दिसताहेत. मात्र, जळगावात एसटी कंडक्टरने एक आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. मतदारांनी जागरूक होऊनच मतदान करावे. प्रत्येकाने मतदान करावे आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता देशाच सरकार स्वतः निवडून आणावे. देशाचा विकास घडवुन आणावा. याबाबत जनजागृती करण्यासाठी एसटी महामंडळातील बस कंडक्टरनी व्यापक जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. बसमध्ये प्रवासी चढल्यानंतर तिकीट विचारणारे बस कंडक्टर आता तिकीट देण्यापूर्वी प्रवाशांचं प्रबोधन करताना दिसत आहे. कुठलंही सरकार पाडण्यासाठी किंवा उभा करण्यासाठी मतदात्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मतदानाला पाठ न फिरवता प्रत्येकाने मतदान करावं, ही आग्रही भूमिका आता बस कंडक्टर बजावताना दिसत आहे

आपल्यातले कौशल्य पणाला लावून जळगावचे गोपाळ पाटील हे बस कंडक्टर गेल्या काही दिवसांपासून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आले आहेत. आपलं मत हे अनमोल आहे आणि ते वाया जाता कामा नये, देशाची लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. असा आग्रह गोपाळ पाटील प्रवाशांना करताना दिसत आहे. आपल्या प्रसन्न चेहऱ्याने आणि लाघवी वाणीने सर्वांचे लक्ष वेधून घेत गोपाळ पाटील हे मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. यातून एक अनोखा आनंद एक समाधान आपल्याला मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी गोपाळ पाटील यांनी व्यक्त केली आहे.

लातूरचे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानंतर आपण खरोखर प्रेरणा घेतली आणि जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत आपल्याला पोहोचून मतदानाचे महत्त्व पटवून देता येत असल्याने त्यात मोठा आनंद मिळत असल्याचा गोपाळ पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

बस सुरू होण्यापूर्वी गोपाळ पाटील हे प्रवाशांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगतात. 'बाबांनो, तुमचं मत हे अतिशय महत्त्वाचं आहे. देशाचा लोकशाही घडवणारे तुमचं मत आहे. ते व्यर्थ जाऊ देऊ नका.' मतदानाचा आग्रह गोपाळ पाटील हे प्रत्येकाला करताना दिसत आहे. या बस कंडक्टरच्या प्रबोधनानंतर नक्कीच यंदा मतदानाचा टक्का वाढणार, असं चित्र दिसू लागलंय. कारण ज्या प्रवाशांनी हे प्रबोधन गोपाळ पाटील यांच्याकडून ऐकलं ते प्रवासी आता मतदानाच्या दिवशी आवर्जून मतदार मतदान करणार असल्याची ग्वाही देखील या वेळेस देताना दिसत आहेत.

मतदारांनो, तुम्ही जागृत व्हा देशाची लोकशाही बळकट करा तुमचा नेता तुम्ही निवडून आणा आणि प्रलोभनांना बळी पडलात तर देश संकटात येईल, असे मतदानाची माहिती पटवून देताना बस कंडक्टर गोपाळ पाटील दिसत आहेत. त्यांच्या आवाहनाला देखील चांगलाच प्रतिसाद सामान्य नागरिकांकडून मिळत असल्याचं बघायला मिळत आहे

एकीकडे नेतेमंडळी मोठाली आश्वासन देण्यामध्ये दंग झालेले आहेत. कुठलंही सरकार आला तरी आश्वासन मात्र केवळ आश्वासनेच असतात ती पूर्ण होत नाही त्यामुळे अनेक वेळा मतदाते हे मतदानाला न जाता पाठ फिरवताना दिसतात. मात्र या वेळी नक्की मतदान करू, या निवडणुकीत योग्य व्यक्तीलाच निवडून देऊ यासाठी जनजागृती करू त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, अशी महत्त्वाची भूमिका गोपाळ पाटील बजावताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का हा निश्चितच वाढणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.


भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या