बीडमधील भाजप आमदार या कारणामुळे सोशल मीडियावर 'ट्रोल'

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आता लोक पाच वर्षात काय केलंत? असा सवाल करू लागले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 10:20 AM IST

बीडमधील भाजप आमदार या कारणामुळे  सोशल मीडियावर 'ट्रोल'

बीड, सुरेश जाधव, 02 एप्रिल : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत प्रत्येक जण प्रचार करताना दिसत आहे. पण, यावेळी आता लोकप्रतिनिधींना देखील लोकांच्या प्रश्नांना समोरं जावं लागत आहे. त्यावेळी त्यांची पुरती गोची होत आहे. बीडमधील भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर देखील प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यावेळी लोकांना काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेना. यावेळचा व्हिडीओ आता सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. तर, यावेळी सभेत गोंधळ देखील उडाला. विरोधकांनी मात्र ही संधी न दवडता भाजप आमदार संगीत ठोंबरे यांना लक्ष्य केलं.


काय घडलं?

भाजपच्या बीडमधील लोकसभा उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. आमदार संगीता ठोंबरे या देखील प्रचारात उतरल्या आहेत. प्रितम मुंडे यांच्या प्रचारासाठी ठोंबरे केज तालुक्यातील माळेगावमध्ये गेल्या असता गावांतील लोकांनी त्यांचा सत्कार केला. पण नंतर मात्र पाच वर्षात काय केलं? अशा शब्दात पाच वर्षांचा हिशोब विचारायला सुरुवात केली. विकास कामे, फंड, पीक विमा, रस्ते कुठे आहेत? असे सवाल केला. त्यामुळे संयोजक आणि ग्रामस्थ हमरी-तुमरीवर आले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं हे आमदार ठोंबरे यांना कळेना. तेंव्हा कार्यकर्ते बोलायला लागल्यानंतर आमदार देखील संतापल्या. पण या प्रकारामुळे लोकांमधील आमदारावरची नाराजी स्पष्ट स्पष्ट समोर आली. बीडमध्ये सध्या याच व्हिडीओची चर्चा सुरू आहे.

डॉ. प्रितम मुंडे यांनी दुसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी भरला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं आव्हान असणार आहे.

Loading...


निवडणुकीनंतर 'चौकीदार' जेलमध्ये असेल- राहुल गांधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...