S M L

'एक्झिट पोल' विरोधात आला तरी मीच जिंकणार, उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठेची केली ही जागा

'एक्झिट पोल' आपल्या विरोधात आला तरी मीच जिंकणार, असा दावा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराला नाही तर हवा पालट करायला आले होते, असा टोलाही जाधव यांना लगावला.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:05 PM IST

'एक्झिट पोल' विरोधात आला तरी मीच जिंकणार, उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठेची केली ही जागा

विजय देसाई (प्रतिनिधी)

वसई, 22 मे- 'एक्झिट पोल' आपल्या विरोधात आला तरी मीच जिंकणार, असा दावा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराला नाही तर हवा पालट करायला आले होते, असा टोलाही जाधव यांना लगावला. एवढं बोलून जाधव थांबले नाहीत. किटली, चहावाले पंतप्रधान बनू शकतात तर शेतकऱ्यांचा मुलगा खासदार का नाही बनू शकत, अशा शब्दांत जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता खोचक टीका केली.

शेतकऱ्याची थट्टा; खरीप पिकाच्या अनुदानापोटी खात्यात आले केवळ 4 रूपये!


पालघरची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांनी प्रचारादरम्यान तळ ठोकून बसले होते. तर यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार व डहाणू ,जव्हार मोखाडा या भागात जोरदार प्रचार केला होता. दरम्यान, पालघर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास उरले आहेत. उद्याच्या निकाला विषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

पालघर : भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढत

शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपात पालघरची जागा कुणाला मिळणार यावरून बराच खल झाला. 2014 च्या निवडणुकीत येथे एकत्र लढलेले शिवसेना आणि भाजप 2018 च्या पोटनिवडणुकीत मात्र आमनेसामने आले. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला. श्रीनिवास वनगा हे चिंतामण वनगा यांचे चिरंजिव आहेत.

Loading...

बुलडाण्यात सेना आणि राष्ट्रवादीने केला विजयाचा दावा..वंचित आघाडीचे मतदान निर्णायक ठरणार

पोटनिवडणुकीत सेनेचा पराभव

पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून वाद होता. अखेर ही जागा शिवसेनेकडे आली पण भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना इथून उमेदवारी देण्यात आली. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना यावेळी उमेदवारी दिली. बळीराम जाधव हे 2009 चे पालघरचे खासदार आहेत.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा इथून निवडून आले. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. 2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 838 मतं मिळाली.

पालघरमध्ये विजय कुणाचा ?

पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू आणि विक्रमगड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पालघर शिवसेनेकडे आहे तर बोइसर, नालासोपारा आणि वसई बहुजन विकास आघाडीकडे आहे. या निवडणुकीत युती असलेल्या भाजप शिवसेनेला पालघरची प्रतिष्ठेची जागा मिळते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.


SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close