पवारांच्या बारामतीत अमित शहांचा हल्लाबोल

पवारांच्या बारामतीत अमित शहांचा हल्लाबोल

शरद पवार सत्तेत असताना 10 वर्षात काय केलंत याचा हिशेब द्या अशी टीका अमित शहा यांनी बारामती येथे बोलताना केली आहे.

  • Share this:

बारामती, 19 एप्रिल : काहीही करून बारामती जिंकायची असा निर्धार भाजपनं केला आहे. कांचन कुल यांना भाजपनं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बारामती येथे प्रचार सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. बारामतीत मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. घाव घालायचा तर मुळावर घाला. महाराष्ट्राचे भले होईल अशी टीका यावेळी अमित शह यांनी केली. यावेळी बोलताना 'काहीही करून बारामती जिंकायची' असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला. तर, देशात सर्वत्र मोदी मोदी आवाज ऐकू येत असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना अमित शहा यांनी शरद पवारांना देखील लक्ष केलं.


पवारांवर टीका

10 वर्षे सत्तेत असताना काय केलंत? याचा हिशेब महाराष्ट्राला द्या. तुम्ही सत्तेत असताना महाराष्ट्राचा विकास झाला की घसरण? असा सवाल अमित शहा यांनी केला. सहकार, शेती, उद्योग, दूध उत्पादन या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन होता. पण, पवार सत्तेत असताना राज्याचा नंबर घसरल्याची टीका यावेळी अमित शहा यांनी केली. यावेळी अमित शहा यांनी बारामती, पुणे, पश्चिम महाराष्ट्राला दिलेल्या आर्थिक मदतीची माहिती देखील दिली. तर, सत्तेत 50 वर्षे राहण्याची कला केवळ शरद पवारांना असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे.


साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही, पक्षाने झटकले हात


2014ची चूक पुन्हा करणार नाही

दरम्यान, 2014मध्ये महादेव जानकारांना 35 हजार मतं कमी पडली. त्यावेळी आम्ही कमळ चिन्ह न देण्याची चूक केली होती. पण, आता अशी चूक होणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.


राहुल गांधींवर हल्ला

राहुल बाबा गरिबी हटाव म्हणून किती काळ लोकांना मूर्ख बनवणार? असा सवाल यावेळी अमित शहा यांनी केला. तसेच पुलवामामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचा हल्ला नरेंद्र मोदींनी घेतला. पण, बालाकोट एअर strike नंतर पाकिस्तान आणि राहुल कंपनीला दुःख झालं झाल्याची टीका यावेळी अमित शहा यांनी केली. शिवाय, उद्या आमची सत्ता आली नाही तरी काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ देणार नाही असं देखील अमित शहा यांनी आपल्या बारामतीतील भाषणामध्ये म्हटलं आहे.


VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 06:44 PM IST

ताज्या बातम्या