पराभवाचा दणका बसलेल्या महाराष्ट्राच्या या 8 राजकीय नेत्यांचं आता काय होणार?

लोकसभा 2019मध्ये अनेक धक्कादायक असे निकाल समोर आले. मोठ्या नेत्यांना जनतेनं नाकारल्यानं त्याचा अर्थ काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा दारूण पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला. त्यामुळे पदार्पणातच पार्थ पवार यांना दणका बसला.

भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार असलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना देखील कोकणात मोठा धक्का बसला आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांना सलग दुसऱ्यांदा कोकणातील जनतेनं नाकारलं आहे. त्यावर बोलताना यापुढे निवडणूक लढवायची की नाही? याचा विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. आपल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी मतदारांना भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं. निकालाअंती मनसे फॅक्टर फोल ठरल्याचं दिसून आलं.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा देखील सोलापुरातून सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर स्वामी यांनी शिंदे यांना धोबी पछाड केलं.

माजी सार्वजनिक बांधकांम मंत्री छगन भुजबळ यांचा नाशिकवर होल्ड आहे हे आजवरचं गणित. पण, 2019च्या लोकसभा निडणुकीमध्ये पुतणे समीर भुजबळ यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणाहून पराभूत झाले. दोन्ही ठिकाणी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. नांदेडमधील पराभव हा अशोक चव्हाण आणि काँग्रेसला देखील मोठा धक्का आहे.

शेतकरी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांचा पराभव देखील राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ मानली जाते. शेट्टी 1 वर्षे खासदार होते. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 07:39 PM IST

ताज्या बातम्या