'राज ठाकरेंनी मोदी, शहांना घालविण्याची 'सुपारी' नाही तर 'विडा' घेतला'

'राज ठाकरेंनी मोदी, शहांना घालविण्याची 'सुपारी' नाही तर 'विडा' घेतला'

'राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम होत नसेल तर भाजला का घाम फुटला.'

  • Share this:

मुंबई 16 एप्रिल : राज ठाकरे यांच्या सभांवरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज यांचा सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला थेट फायदा होणार आहे. त्यामुळे भाजपने राज ठाकरेंवरची टीकेची धार वाढवली आहे. 'न्यूज18 लोकमत'च्या 'बेधडक' कार्यक्रमात या विषयावरची चर्चा चांगलीच रंगली. कधी काळी मनसेवर तुटून पडणारे काँग्रेसचे प्रवक्ते आज मनसेच्या मदतीला धावून आले. 'राज ठाकरेंनी मोदी, शहांना घालविण्याची 'सुपारी' नाही तर 'विडा' घेतला' असं मत काँग्रेसचे प्रवक्ते अरूण सावंत यांनी व्यक्त केलं. तर राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम होत नसेल तर भाजला का घाम फुटला असा सवाल मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी केला. विडा का सुपारी? हा आजच्या बेधडकचा विषय होता.

या कार्यक्रमात मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे, काँग्रेसचे अरुण सावंत, राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड, पत्रकार किरण तारे आणि प्रफुल साळुंखे यांनी सहभाग घेतला.

अघोषीत आणीबाणी

संदिप देशपांडे म्हणाले, देशात आज 1977 सारखी परिस्थिती आहे. तेव्हा घोषीत आणीबाणी होती आता अघोषीत आणीबाणी आहे. लोकांना बोलण्याचं स्वातंत्र नाही. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंच्या भाषणांमुळे काहीच होणार नसेल तर भाजप या सभांना का घाबरत आहे.

राज ठाकरेंचे नकलांचे कार्यक्रम

Loading...

त्याला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले, गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विचारस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करुन खोटा प्रचार करण्यात आला. मुस्कटदाबी होत असती तर राज ठाकरे नकलांचे कार्यक्रम करु शकले नसते. ते सध्या गावोगावी नकलांचे कार्यक्रम करत आहेत. निवडणुकीच्या काळात प्रत्येकाल आपला अजेंडा घेऊन मतदानात जावे लागते. पण राज ठाकरे असं काहीही करत नाहीत.

संदिप देशपांडे यांनी अशीही टीका केली की, ऐकेकाळी भाजपचे फक्त 2 खासदार होते म्हणजे भाजप निवडणूक लढविण्यास नालायक होता का? त्यावर शिवराय कुलकर्णी म्हणाले, दोन खासदार असतानाही भाजप निवडणूक लढत होता त्यामुळे भाजपने खोटेपणा केला नाही.


राज ठाकरेंचं स्वागतच

राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. यात कुणी सहभागी होत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. यात सहभागी होणं म्हणजे निवडणूक लढविली पाहिजे असंच नाही. यात विचारवंत, लेखक, कलाकार असे सगळे सहभागी होऊ शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुपारी घेतली असे म्हणणं योग्य नाही.

सुपारी नाही विडा

काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले, राज ठाकरेंच्या सभांनी कुणाचा फायदा होत असेल तर त्यात काय चुक आहे. राज ठाकरे यांनी सुपारी नाही तर विडा घेतला आहे. मोदी, शहा यांच्यासारख्या घातक शक्तींना घालविण्याचा विडा उचलला आहे.

राज ठाकरेंचं अर्धसत्य

ज्येष्ठ पत्रकार किरण तारे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याने ऑडीओ, व्हिज्युअल्सचा वापर केला आहे. पण राज ठाकरे जे सांगत आहेत ते सर्वच खरं नाही, उदाहरण म्हणजे, राज म्हणाले की गोदावरीचं पाणी गुजरातला जाणार आहे, पण त्यात काहीही तथ्य नाही, तसच हरिसाल या डिजिटल गावातला जो तरुण दाखवला होता तो तरुण हा मॉडेल होता. पैसे दिले की कुणीही जाहीरात करु शकते.

विधानसभेची तयारी

प्रफुल साळुंखे म्हणाले, राज ठाकरेंची एक शैली आहे. तरुणांवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे काठावरची मतं जावू शकतात अशी भीती भाजपला वाटते. निवडणुकीत सध्या दोघांवर आरोप होत आहेत. वंचित आघाडीवर भाजपची बी टीम तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज ठाकरे ही बी टीम असल्याचा आरोप होतो. यात जास्त मतं कोण खातो यावर विधानसभेचं गणित अवलंबून आहे.

आपला पक्ष गुंडाळून ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीसाठी राज ठाकरे मतं का मागत आहेत. असा सवाल शिवराय कुलकर्णी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...