'या मतदारां'चा उत्साह तरूणांना देखील लाजवेल

देशात 114 जागांकरता आज मतदान पार पडत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 08:50 AM IST

'या मतदारां'चा उत्साह तरूणांना देखील लाजवेल

मुंबई, 23 एप्रिल : देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. 114 जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. दरम्यान, मतदारांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या असून काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार देखील समोर आले. बारामती, सातारा, अहमदनगरमध्ये देखील आज मतदान पार पडत आहे. यावेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार यांनी देखील मतदानाचा हक्का बजावला. पुणे येथे 94 वर्षाच्या प्रभाकर भिडे आणि 88 वर्षाच्या सुशिला भिडे यांनी देखील सकाळीच मतदान केलं. त्यांच्यामधील हा उत्साह तरूणांना देखील लाजवणारा होता.Loading...
गुजरातमध्ये देखील मतदान

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील 26 आणि केरळमधील 20 जागांवर मतदान पार पडत आहे. गांधीनगरमधून अमित शहा देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाला जाण्यापूर्वी आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मतदान केंद्रबाहेर लोकांनी मोदी – मोदी अशा घोषणा दिल्या.


VIDEO: विकासाच्या मुद्याऐवजी मोदी घराणेशाहीवर घसरले: अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 08:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...