'या' कारणासाठी विक्रम गोखलेंनी PM मोदींचाही केलाय निषेध

विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका करत त्यांचा निषेध केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 05:48 PM IST

'या' कारणासाठी विक्रम गोखलेंनी PM मोदींचाही केलाय निषेध

मुंबई, 5 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे चर्चेत आहेत. पण विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका करत त्यांचा निषेध केला आहे.

'लोकशाहीची गळचेप होतेय असं म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे,' असं धक्कादायक वक्तव्य केल्याने अभिनेते विक्रम गोखले चर्चेत आले. त्यानंतर एका मराठी वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. याबाबतही आता मोठी चर्चा होत आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केलं. पण त्यानंतरही नरेंद्र मोदींनी साध्वींची पाठराखण केली. इतर मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींची स्तुती करणाऱ्या विक्रम गोखलेंनी पंतप्रधान मोदी यांनी साध्वीची पाठराखण केल्याने त्यांच्यावर टीका केली आहे.

'साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं असून या साध्वींची पाठराखण केल्याबद्दल मोदींचा मी निषेध करतो,' असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले विक्रम गोखले?

Loading...

'राज ठाकरे यांनी आपल्या सभेत दाखवलेले व्हिडिओ कितपत खरे आहेत, हे पाहायला हवं. पण ज्यांना मनोरंजनासाठी राज यांच्या सभा पाहिच्या आहेत, त्यांनी त्या पाहाव्यात,' अशी टीका विक्रम गोखले यांनी केली आहे.

शरद पवारही लक्ष्य

विक्रम गोखले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'शरद पवार व्हिजनरी नेते आहेत. पण त्यांनी जसा बारामतीचा विकास केला तसा संपूर्ण महाराष्ट्राचा का केला नाही,' असा सवाल गोखले यांनी शरद पवारांना केला आहे.


SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...