News18 Lokmat

सुप्रिया सुळे यांच्या मालमत्तेत 67 टक्क्यांची वाढ

सुप्रिया सुळे यांच्यावर कुठल्याही गुन्ह्यांची नोद नाही. तसच त्यांच्या नावावर एकही वाहन नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 04:56 PM IST

सुप्रिया सुळे यांच्या मालमत्तेत 67 टक्क्यांची वाढ

वैभव सोनवणे,पुणे 3 एप्रिल : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी मालमत्तेचं प्रतिज्ञापत्रही दाखल केलं. त्यात गेल्या पाचवर्षात त्यांच्या मालमत्तेत 67 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलंय.

सुप्रिया सुळे यांच्या यांच्या स्थावर मालमत्ता 18 कोटींच्या आहेत. त्यांच्या नावे एकही वाहन नाही. तर त्यांच्याकडे फक्त दीड लाख रुपयांचं सोनं आहे. सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे हे व्यावसायीक आहेत. त्यांची विदशतही गुंतवणूक आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

नरेंद्र मोदींवर टीका

''ज्यांना एकटं असण्याचा सार्थ अभिमान आहे, त्यांना काय नाती-गोती कळणार? नाती जपणं हे फार मोठ काम असंत. नाती तोडायला वेळ लागत नाही, जोडायला खूप वर्ष लागतात. गेल्या ५० वर्षा राज्यातल्या जनतेने शरद पवारांवर प्रेम केलं, विश्वास दाखवला त्याची जाणीव अजिद दादांना, मला आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे'', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरण्यापूर्वी पार पडलेल्या प्रचार सभेत त्यांनी नाव न घेता मोदींवर निशाणा साधला.

अजित पवारांनीही साधला निशाणा

Loading...

पुण्यामध्ये आयोजित सभेत अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'जे लोक भाजपमध्ये गेले ते कशासाठी गेले, हे मी नाव घेऊन सांगेन' असं माजी मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 'मला सगळ्यांची अंडीपिल्ली माहीत आहेत' असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

'भाजपमधील नेते मुलींना पळून नेण्याची भाषा करतात, शेतकऱ्यांना साले म्हणातात अशा नेत्यांनी बोलताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे.' असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, 'माझी चुक झाली. त्याबद्दल मी माफी मागितली आहे. पण बोलताना तोलून-मापून बोला' असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

मोहन जोशींच्या मागे ताकदीने उभे

तर 'काँग्रेसने दिलेले उमेदवार मोहन जोशी यांच्या मागे आम्ही सगळे ताकदीनं उभे आहोत' असंही पवार म्हणाले. आज सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतूक केलं. 'देशात एक नंबरचं काम सुप्रियाचं' असं अजित पवार म्हणाले आहेत.

बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचे अर्ज भरला. यासाठी नरपतगिरी चौकात संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार उपस्थित होते.

सुप्रिया सुळेंनी कॉन्सिल हॉलमध्ये अर्ज भरला. अर्ज भरायला जात असतानाच सुप्रिया सुळे स्टेजवरच अजित पवार यांच्या पाया पडल्या. त्यामुळे मोदींनी पवार कुटुंबाच्या कलहाच्या वक्तव्याला जाहीर छेद देण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...