मौनव्रत, भगवे कपडे आणि पीएचडी... 'बोलणारा देव मी' म्हणणारा भाजपचा हा उमेदवार पुन्हा चर्चेत

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 07:52 PM IST

मौनव्रत, भगवे कपडे आणि पीएचडी... 'बोलणारा देव मी' म्हणणारा भाजपचा हा उमेदवार पुन्हा चर्चेत

मुंबई, 10 एप्रिल : मतदानासाठी आवाहन सगळेच राजकीय नेते करत असतात, पण भाजपचे सोलापूरचे उमेदवार त्यांच्या आवाहनातल्या अजब विधानामुळे चर्चेत आले होते. 'मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून देवदर्शनाला गेलात तरी पुण्य मिळणार नाही. समाधान मिळणार नाही. कारण बोलणारा देव मीच आहे', असं वादग्रस्त विधान करणाऱ्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. 'जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पाच रुपये घेऊन मठात बसावं', अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपच्या या उमेदवारावर निशाणा साधला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत उत्तर दिलं.

कोण आहेत जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी?

भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगायत समाजात वंदनीय व्यक्तिमत्त्व मानलं जातं. भाजपने अनपेक्षितपणे त्यांना उमेदवारी दिल्याने सोलापुरातून दिग्गज विरोधकांना टक्कर द्यायला हे भगव्या कपड्यातले महास्वामी सज्ज झाले आहेत. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौड इथल्या वीरशैव मठाचे मठाधिपती आहेत. शिवाय बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांना पीएचडी मिळालेली आहे. महास्वामींना अनेक भाषा येतात. त्यांचं हिंदीवर प्रभुत्व आहे.शिवाय काही कन्नड आणि तेलुगू भाषिकही त्यांचे भक्त आहेत. दर गुरुवारी ते मौनव्रत करत असत, असं त्यांचे अनुयायी सांगतात. पण निवडणुकीच्या धामधुमीमुळे हे व्रत करणं आता शक्य होत नाही. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून सिद्धेश्वर शिवाचार्य यांना भाजपने उमेदवारी दिली, त्या वेळी आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कारण बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदेंचा गेल्या निवडणुकीत तब्बल दीड लाखांनी  पण सोलापुरातली जातीय समीकरणं लक्षात घेता भाजपची ही चाल मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीने असल्याचं काही विश्लेषकांचं मत आहे.


तिरंगी सामना

Loading...

सोलापूर मतदारसंघात लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाच आता इथे मोठा लढा द्यावा लागणार आहे. भाजप - सेना युती विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी असा सरळ सामना नाही, तर प्रकाश आंबेडकर स्वतः या मतदारसंघातून रिंगणात उतरल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा तिसरा रंग या लढतीला मिळाला आहे. दलित, मुस्लीम, धनगर, लिंगायत यांचं प्राबल्य या मतदारसंघात आहे. शिवाय कन्नड भाषिक आणि तेलुगू भाषिक मतदारही सीमेजवळच्या भागात आहेत.  त्यामुळे जातीचा मुद्दाच इथे मोठा होऊन मतांचं ध्रुवीकरण कऱण्याचे प्रयत्न होणार हे उघड आहे. भाजपने म्हणूनच इथे ही जातीची समीकरणं लक्षात घेऊन ऐन वेळी अनपेक्षित उमेदवार दिला
वादग्रस्त विधानं

सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या 'मीच देव आहे', अशा अर्थाच्या वादग्रस्त विधानाचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजप आमदारांची तुलना थेट विठ्ठलाशी केल्याने पुन्हा एकदा वाद ओढवला. प्रचारसभेत कुणीतरी गटारांच्या दुरुस्तीचा विषय मांडल्यावर त्याला समजावताना जयसिद्धेश्वर महाराज म्हणाले की,  'तुमच्या समस्या परिचारक मालकांच्या कानावर घाल. तसं केलंस की विठुरायाला सांगण्यासारखे आहे.' या वक्तव्यावरूनही वादंग माजला गोता.

अक्कलकोटमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महास्वामींना मत देण्याचं आवाहन करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यापूर्वी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार सोलापुरात आले होते. त्या वेळी "महाराज तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा", असं म्हणत शरद पवार यांनी जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर निशाणा साधला होता. हा व्हिडिओसुद्धा बराच व्हायरल झाला होता.

सोलापूर मतदारसंघात 17 लाख मतदार आहेत. त्यापैकी 15 टक्के मुस्लीम, 13 टक्के दलित आणि 50 टक्क्यांवर मतदार ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचे आहेत. हे मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करतात यावरून या मतदारसंघाचा कौल निश्चित होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...