• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवंय, की त्यांना दूध पाजणारं?-उद्धव ठाकरे
  • VIDEO: देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवंय, की त्यांना दूध पाजणारं?-उद्धव ठाकरे

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 12:41 PM IST | Updated On: Apr 9, 2019 12:50 PM IST

    औसा (लातूर), 9 एप्रिल : ''तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं आहे, की माडीवर घेऊन दुध पाजणारं सरकार हवं आहे?'' असा प्रश्न करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील औसा इथे पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाही सभेत ते बोलत होते. युती झाल्यानंतर प्रथमच मोदी आणि उद्धव एकत्र आले होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील गरिबी हटाव या मुद्यावर बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तुमच्या आजीबाईंपासून सुरू झाली आहे 'गरीबा हटाव'. तुमची हटली पण जनतेची कधी हटणार? आणि यांची गरिबी हटविण्यासाठी म्हणून आम्हाला पुन्हा आपलं सरकार सत्तेत आणायचं आहे'', असं उद्धव म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी