‘आज देशात एक चौकीदार; बाकी सगळे थकबाकीदार’

‘आज देशात एक चौकीदार; बाकी सगळे थकबाकीदार’

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

  • Share this:

जालना, विजय कमळे-पाटील, 15 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. आमच्याकडे काही लोकांना चांगली पदवी मिळते. कुणाला पद्मश्री मिळते. मला स्वतःला पद्मविभूषण ही पदवी मिळाली आहे. कुणी निवडून दिलं तर आमदार म्हणतात. लोकसभेत गेलं तर खासदार म्हणतात. अशा विविध पदव्या मिळत असतात. पण, तुमच्यापैकी बहुतांशी लोकांना काही न करता एक पदवी मिळते. तुम्ही ज्या दिवशी कर्जबाजारी झालात, देणं थकलं की तुम्हाला पदवी मिळते थकबाकीदार. तुमच्या नावापुढे थकबाकीदार लागतं. पण, आज देशात एक चौकीदार आणि बाकी सगळे थकबाकीदार अशी अवस्था झाल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ जालना जिल्ह्यातील परतूर येथे आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.


'राज्यकर्त्यांना सर्वत्र मीच दिसतो'

यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, इतिहासाच्या पुस्तकात असं होतं की शिवाजी महाराजांच्या नंतर सेनेतील धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या दोघांचा मोगलांनी एवढा धसका घेतला की त्यांचे घोडे पाणी प्यायला आले की त्या पाण्यात त्यांना धनाजी-संताजी दिसायचे. तसेच आजच्या राज्यकर्त्यांना सगळीकडे शरद पवारच दिसतो, असा उपरोधिक टोला देखील शरद पवार यांनी यावेळी विरोधकांना लगावला.


भाजपमधील बंड थांबवण्यात वरिष्ठांना अपयश, खास हेलीकॉप्टरने नंदुरबारमध्ये दाखल झाले गिरीश महाजन


नरेंद्र मोदींची टीका

लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याला शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. पण, आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील परतूर येथे बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.


जोरदार आरोप – प्रत्यारोप

'आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल' असा इशारा पवारांनी मोदींना बीड येथील जाहीर सभेत दिला होता.

'मोदींना माझ्या कुटुंबाची काळजी आहे. ते म्हणतात, सगळा पक्ष पुतण्या चालवतो. पवारांची अवस्था गंभीर आहे. त्यांचं घरात कोणी ऐकत नाही. माझ्या घराची चिंता त्यांना. आम्ही सगळे एका जिवाभावाने वागतो. पण मोदीजी दुसऱ्याच्या घरात डोकावणं, हे वागणं बर नव्हं,' अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली होती.

त्यानंतर 'शरद पवार तुम्ही लक्षात घ्या, मोदींचा परिवार संपूर्ण 125 कोटी जनता आहे. तुम्ही मोदींच्या परिवाराकडे लक्ष देण्याची हिंमत करू नका, असं थेट आव्हान भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलं आहे.


VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या