सुजय विखे Vs संग्राम जगताप लढतीत नवा ट्विस्ट, 'या' उमेदवाराने घेतली उडी

सुजय विखे Vs संग्राम जगताप लढतीत नवा ट्विस्ट, 'या' उमेदवाराने घेतली उडी

नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

  • Share this:

अहमदनगर, 28 मार्च : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपबरोबर आता आणखी एका उमेदवाराने उडी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

संजीव भोर यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांची एक मेळावा घेतला. याच मेळाव्यात नगरमधून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.  या मेळाव्यासाठी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील देखील आवर्जून उपस्थित होते. संजीव भोर यांना पाठिंबा देतांना या भागातील ऊस उत्पादक शेतकरी प्रस्थापित नेत्यांना कंटाला असून आता तो संजीव भोर यांच्या पाठमागे उभा राहील, असं मत रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुयज विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असताना ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, यासाठी सुजय विखे यांनी बराच हट्टही केला होता. परंतु तसं करण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. त्यानंतर सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.


 

SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 07:13 PM IST

ताज्या बातम्या