पक्षाचे मतदान 40 हजार, अधिकृत उमेदवाराला मिळाली साडेचार हजार मतं!

पक्षाचे मतदान 40 हजार, अधिकृत उमेदवाराला मिळाली साडेचार हजार मतं!

लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याने बहुजन समाज पक्षाने राज्यभर काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 27 मे: लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याने बहुजन समाज पक्षाने राज्यभर काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोंनवणे यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये जया राजकुंदल या बसपाच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांच्या पराभवात पक्षातील नेत्यांचा सहभाग होता असे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे जवळपास 40 हजार मतदान आहे. मात्र पक्षाचे उमेदवार राजकुंदल यांना केवळ साडेचार हजार एवढेच मतदान झाले. महेंद्र सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्या विजयाचे काम केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने सोलापूर, नागपूर येथील काही पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित आघाडीमुळे दलित मतांचे एकत्रिकरण झाले होते. त्यामुळेच बसपाच्या उमेदवार राजकुंदल यांना केवळ साडेचार हजार मते मिळाली. विशेष म्हणजे याआधीच्या सर्व निवडणुकीत बसपाला 40 हजारहून अधिक मते मिळाली होती. पक्षाचे केडर बेस मतदान 40 ते 45 हजार आहे. ही मते नेहमी बसपाच्या उमेदवारालाच मिळतात. पण यावेळी वंचितमुळे बसपाची मते दुसऱ्या उमेदवाराला मिळाली. त्यामुळेच पक्षाने ही कारवाई केली आहे.


VIDEO: 'रामराजे हे बिनलग्नाची औलाद', भाजपच्या नवनिर्वाचित खासदाराची खालच्या पातळीवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 09:49 AM IST

ताज्या बातम्या