अहमदनगर, 12 एप्रिल : सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये आयोजित मोदींच्या सभेपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भन्नाट कविता रंगल्या. ''संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके, आणि निवडून येणार आहेत सुजय विखे. आता हे लोक राहिले नाहीत मुके, मग का निवडून येणार नाहीत सुजय विखे? आम्हाला नको आहेत तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके, आम्हाला हवे आहेत डॉ. सुजय विखे'', असा विरोधी पक्षांवर शब्दांचा मारा करत त्यांनी सुजय विखे यांना निवडून आणण्याचं आवाहन जनतेला केलं.