S M L

Lok sabha election 2019 राज ठाकरेंची भूमिका अजूनही गुलदस्त्यात? मनसैनिक संभ्रमात

पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता महिनाभरापेक्षाही कमी कालावधी राहिला. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजुनही भूमिका जाहीर केली नाही.

Updated On: Mar 15, 2019 09:30 PM IST

Lok sabha election 2019 राज ठाकरेंची भूमिका अजूनही गुलदस्त्यात? मनसैनिक संभ्रमात

मुंबई 15 मार्च : लोकसभेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झालीय. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला महिनाभरापेक्षा कमी कालावधी राहिलाय. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्याही येत आहेत. असं असताना महाराष्ट्रातला महत्त्वाचा राजकीय पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अजून धोरणच जाहीर झालेलं नाही. मनसे निवडणूक लढवणार का? कुणाला पाठिंबा देणार? हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजुन जाहीर केलेलं नाही त्यामुळे मनसैनिक संभ्रमात आहेत.

महाराष्ट्रात आता युती विरूद्ध आघाडी असा सरळ सामना रंगण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीने तिसरा पर्याय दिला मात्र निकालात त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही असंही बोललं जातय. राज्यातले बहुतांश राजकीय पक्ष कुठल्यातरी आघाडीत आहे. त्याला अपवाद म्हणजे मनसे.

मनसेचं एकला चलो रे?


निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी जोरदार हवा निर्माण केली होती. पंतप्रधान मोदींवर सातत्याने कडक प्रहार करून राज यांनी मोदी विरोधक अशी हवा निर्माण केली होती. नंतर शरद पवारांची मुलाखत घेऊन त्यांनी त्यांच्याशी जवळीकही निर्माण केली. राष्ट्रवादीने मनसेला आघाडीत घेण्यासाठीही प्रयत्न केला मात्र काँग्रेसने विरोध केल्याने मनसेला आघाडीत स्थान मिळाले नाही.

मात्र निवडणूक तारखांची घोषणा होऊन आठवडा झाला तरी मनसेची भूमिका काय राहणार याबद्दल राज ठाकरेंनी अजुनही घोषणा केली नाही त्यामुळे मनसैनिक संभ्रमात आहे. मनसे निवडणूक लढवणार का? लढविणार असेल तर उमेदवारांचं काय? काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

फक्त एकच आमदार

Loading...

मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचं मनसेचं विधानसभेतलं उरलं सुरलं प्रतिनिधीत्वही गेलं आहे. 2014 मध्ये मनसेने लोकसभेच्या 10 जागा लढविल्या होत्या. आणि जिंकलो तर माझे खासदार नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असंही जाहीर केलं होतं मात्र त्यात मनसेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. पण त्यानंतर उतरती कळा लागली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 09:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close