इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही - राज ठाकरे

आत्तापर्यंत नरेंद्र मोदीं इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही अशी टीका राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 09:16 PM IST

इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही - राज ठाकरे

सोलापूर, 15 एप्रिल : सोलापुरात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही' अशा शब्दात हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपनं, नरेंद्र मोदीनं देशाची फसवणूक केली. त्यांना मदतान करताना विचार करा. केवळ आश्वासनं दिली. पण, त्याचं पुढे काय झालं? असा सवाल देखील केला. तसेच काही जुने व्हिडीओ दाखवत भाजपनं शब्द फिरवल्याची टीका केली. मनसे निवडणुकीच्या रिंगणात नसली तरी सध्या राज ठाकरे महाराष्ट्रात जाहीर सभा घेत भाजपला आपला विरोध दर्शवला आहेत. यापूर्वी नांदेडमधील सभेत देखील राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. शिवाय, यापुढे देखील भाजपची पोलखोल करणार असल्याचा इशारा राज यांनी भाजपला दिला आहे. व्हिडीओ दाखवत राज ठाकरे सध्या भाजपला लक्ष्य करत आहेत. त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देत आहेत.


काय बोलले राज ठाकरे?

सत्तेत येण्यापूर्वी भाजपनं वर्षाला 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन दिलं. पण, नोटीबंदीच्या निर्णयानं 5 ते 6 कोटी नोकऱ्या गेल्या.मराठ्यांना, आर्थिक वंचित घटकांना सरकारनं आरक्षण दिलं, पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? असा सवाल यावेळी राज यांनी केला.


Loading...

रमुक-काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत 75 वर्षांच्या नरेंद्र मोदी समर्थकाचा मृत्यू


बाबासाहेबांचं स्मारक आहे कुठं?

तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची कल्पना माझी. स्मारक म्हणून जगातील सर्वात मोठी लायब्ररी उभी करा. पुतळे का बांधता? असं म्हणत राज यांनी 5 वर्षात बाबासाहेब आंबेडकांचं स्मारक का नाही झालं? असा सरकारला सवाल केला.


मोदींनी जाहीरातींवर 4800 कोटी रूपये खर्च केले

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाचं काय झालं? भाजपकडे दाखवण्यासारखं काही नाही. मोदींनी जाहीरातींवर तब्बल 4800 कोटी रूपये खर्च केल्याचं राज यांनी म्हटलं.


काय आहे नरेंद्र मोदींचा 100 दिवसांचा अजेंडा?


5 वर्षात दाखवलेल्या स्वप्नांचं काय?

पाच वर्षात दाखवलेल्या स्वप्नांबद्दल, दिलेल्या वचनांबद्दल नरेंद्र मोदी यांनी बोलावं असं राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. शिवाय, माझ्या सभांच्या खर्चाची भाजपला चिंता असल्याचा टोला देखील यावेळी राज यांनी लगावला आहे. मोदी देशाशी धादांत खोटे बोलले. सरकारच्या लेखी तुमची काहीही कमी नाही. तसेच हरिसाल गावाबद्दल मी केलेला दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून दाखवावा असं आव्हान देखील राज यांनी दिलं.


...मग दुष्काळ कसा?

1 लाख 20 हजार विहीरी बांधलात मग, राज्यात दुष्काळ कसा? असा सवाल यावेळी राज यांनी राज्य सरकारला केला. सरकार जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय असा आरोप देखील यावेळी राज यांनी केला.


बॉलिवूडमधल्या अपयशानंतर सेक्स वर्कर होणार होता 'हा' अभिनेता, आता भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट


निर्लज्ज पंतप्रधान मी पाहिला नाही

शिवाय, इतका निर्लज्ज पंतप्रधान मी पाहिला नाही म्हणत राज यांनी रशियाच्या वाटेवर देशाला नेण्याचं अमित शहा, नरेंद्र मोदींचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.


पत्रकारांची मुस्काटदाबी

भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास पत्रकार लिहू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी, अमित शहा देशाच्या राजकीय क्षितीजावरून नाहीसे झाले पाहिजेत. मोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका. असं आवाहन यावेळी राज यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं. पुढील सभांमधून सर्व गोष्टी मांडणार असल्याचा इशारा देखील यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.


VIDEO: जयाप्रदांनंतर आझम खान यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य


भाजपनं पैसे वाटल्यास घ्या

भाजपनं जो कहर केला आहे. त्याचा तुम्हाला अंदाज नाही. भाजपनं पैसे वाटल्यास घ्या. यांना रिकामं करा. भाजपनं केसानं गळा कापला. भाजपनं उद्योगपतीचं अडीच लाख कोटींचं कर्ज माफ केलं. असं देखील राज यावेळी म्हणाले.


जवानांच्या नावाचा वापर का?

निवडणुकांसाठी जवानांचा वापर करणार का? असा सवाल राज यांनी यावेळी केला. शिवाय,  पुलवामा हल्ल्यातील आरडीएक्स आलं कुठून? याचं उत्तर नरेंद्र मोदी देणार का? असा सवाल राज यांनी केला. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली.


 

VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातील्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...