News18 Lokmat

सत्तेसाठी युती, जनतेचा विसर; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 09:23 PM IST

सत्तेसाठी युती, जनतेचा विसर; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

महाड, 19 एप्रिल : रायगडमधील महाड येथील जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्तेसाठी युती, जनतेचा विसर पडला अशा शब्दात शिवसेनेवर टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत नरेंद्र मोदींवर देखील जोरदार हल्ला केला. नरेंद्र मोदी यांनी देशातील तरूणांची, तरूणींची फसवणूक केली असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसच्या काळातील योजना नावं बदलून समोर आणल्या असा आरोप देखील केला. शिवाय, आपलं अपयश झाकण्यासाठी नरेंद्र मोदी नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत असल्याचं राज यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. तर, इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही अशा शब्दात राज यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.


नोटाबंदीवरून निशाणा

दरम्यान, नोटाबंदीनंतर सारा पैसा चलनात आला. तसेच काही संस्थांनी त्याबद्दलचे अहवाल देखील दिले असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. देशातील तरूणांना खोटी स्वप्नं दाखवली, शिवाय, मेक इन इंडियाचा फज्जा उडाल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. देशात 3 वर्षात बलात्काराचे आकडे वाढल्याचं देखील राज यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. तर, जवानांच्या नावावर मतं मागणार मी पहिलाच पंतप्रधान पाहिला. कारगिल युद्धानंतर अटलबिहारी वाजपेयींनी देखील असा बाजार नाही मांडला असं राज यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे.


Loading...

वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार प्रियांका गांधी; 'या' आमदाराने केला दावा


नरेंद्र मोदींच्या दत्तक गावाचा दाखवला व्हिडीओ

यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ देखील दाखवला. शिवाय, ज्या माणसाचं आपल्या दत्तक घेतलेल्या गावाकडे दुर्लक्ष आहे तो तुमच्याकडे काय लक्ष देणार? असा सवाल देखील राज यांनी केला.


VIDEO : मनसेबाबत पार्थ पवारांचा महत्त्वाचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...