• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्याच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?
  • VIDEO: पुण्याच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

    News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 03:18 PM IST | Updated On: Mar 30, 2019 03:20 PM IST

    मुंबई, 30 मार्च : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज (30 मार्च) मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी पुणे, रावेर आणि सांगली येथील काँग्रेसच्या उमेदवारीबाबत विशेष माहिती दिली. ''लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली आहे. त्याठिकाणी उमेदवार म्हणून काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे. पुण्याच्या बाबतीत चर्चा सुरू असून निर्णय अतीम टप्प्यात आहे. लवकरच पुण्याच्या उमेदवाराचीही घोषणा होईल'' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. ''मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सांगलिची जागा 'स्वाभीमानी'चे राजू शेट्टी यांना दिली असल्याचं लवकरच ते सांगलिच्या उमेदवाराची घोषणा करीतल. तसंच येत्या 5 एप्रिलपासून राज्यात प्रचार दौऱ्यावर येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी