विलासराव देशमुखांविरोधात बोलणाऱ्या मोदींच्या या मंत्र्याला रितेशचं प्रत्युत्तर

रितेश देशमुखनं आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 09:17 AM IST

विलासराव देशमुखांविरोधात बोलणाऱ्या मोदींच्या या मंत्र्याला रितेशचं प्रत्युत्तर

मुंबई, 14 मे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी 'तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुलगा रितेश देशमुखला चित्रपटामध्ये काम मिळावं यासाठी प्रयत्नशील होते.' पियुष गोयल यांनी केलेल्या या विधानावरून आता अभिनेता रितेश देशमुखनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'माजी मुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारणे हा तुमचा अधिकार आहे. पण, जी व्यक्ती जिवंत नाही त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं असल्याचं ट्विट रितेश देशमुखनं केलं आहे. शिवाय, मला चित्रपटामध्ये काम मिळावं यासाठी वडिलांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याला फोन केला नव्हता. याचा मला अभिमान आहे,' असं उत्तर रितेशनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिलं आहे. 2012मध्ये विलासराव देशमुख यांचं निधन झालं. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.Loading...


पश्चिम बंगालमध्ये ममता-अमित शाह यांच्यातील संघर्ष टिपेला

आणखी काय म्हणाला रितेश

मी माझ्या वडिलांसोबत ताज हॉटेलमध्ये गेलो होतो. पण, मला चित्रपटात काम मिळावं यासाठी तो प्रयत्न केला होता यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं देखील रितेशन आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपल्या ट्विटमधून रितेशनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच रितेशनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोयल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे प्रसंग

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला देखील लक्ष्य केलं होतं. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे ताज हॉटेलमध्ये पाहणी करायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत रितेश देशमुख आणि निर्माता राम गोपाळ वर्मा देखील होते. यानंतर विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका झाली होती. याचा परिणाम म्हणून विलासराव देशमुख यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता.


SPECIAL REPORT: आदिवासी बहुल 'देवरी'तील एका लग्नाची अनोखी गोष्ट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 09:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...