News18 Lokmat

रत्नागिरीत निलेश राणे विरुद्ध उदय सामंत वाद पुन्हा भडकणार?

कोकणात निवडणूक म्हटलं की वाद हे समिकरण जुळलेलं आहे. याही निवडणुकीत राणे विरुद्ध सामंत असा राजकीय सामना रंगण्यची चिन्हे आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 06:08 PM IST

रत्नागिरीत निलेश राणे विरुद्ध उदय सामंत वाद पुन्हा भडकणार?

दिनेश केळुसकर रत्नागिरी 12 एप्रिल : निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच रत्नागिरीत पुन्हा निलेश राणे  आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत वाद भडकण्याची चिन्हे आहेत. याला निमित्त आहे ते रत्नागिरी पोलिसांनी निलेश राणें आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर  शासकीय कामात अडथळा आणल्यावरुन दाखल केलेल्या गुन्ह्याचं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीतल्या हातखंबा चेकपोस्टवर 10 एप्रिल च्या रात्री निलेश राणे आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा आला असता गाड्या तपासणीला मज्जाव करत शिविगाळ आणि धमकी  दिल्याच्या आरोपाखाली निलेश राणे आणि त्यांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी  गुन्हे दाखल केलेत.

नेमकं काय भांडण झालं?

नाकाबंदी चालू असताना डीवायएसपी गणेश इंगळे तिथे हजर होते यावेळी निलेश राणे आणि त्यांच्या साथीदारांच्या गाड्या तिथे आले असताना त्या गाड्यांना चेक करण्यासाठी थांबवला असता जी घटना घडली त्यामध्ये बाचाबाची होणे धमकी देणे त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले त्यांच्याशी ज्या प्रकारचे वर्तन झालेला आहे यासंदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्टेशन याठिकाणी निलेश राणे व त्यांचे इतर साथीदार यांच्याविरोधात धमकी देणे शिवीगाळ करणे अशा प्रकारच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली.

राजकारण तापलं

Loading...

निलेश राणे यानी आपण पोलिसांना शिविगाळ केल्याचं नाकारलं असून  शिवसेना आमदार उदय सामंत यांच्या दबावापोटीच  पोलीस  शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला आहे आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांचा आपण राजकीय अस्त करु असा इशाराही दिलाय. तर उदय सामंत यानीही निलेश राणेंचं हे आव्हान स्वीकारत 23 मे ला रत्नागिरीची जनता कुणाचा अस्त करते ते बघाच असा प्रतिटोला हाणलाय. उदय सामंतांना झुकतं माप दिलं जातं. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा अशारा निलेश राणे यांनी दिला.

जागा दाखवणार

या रत्नागिरी शहराने आज पर्यंत किर्तनाचे कार्यक्रम ऐकले होते गीतरामायणाचे कार्यक्रम घेतले होते. गेले तीन-चार महिने रत्नागिरीकर शिव्यांचे  कार्यक्रम ऐकत आहेत पण गीतरामायणातून जनजागृती होते संस्कार होतात पण हे जे काय कार्यक्रम चाललेले आहेत त्याचे परिणाम काय होतात आणि रत्नागिरीकर त्याला कशा प्रकारे उत्तर देतात आणि कुणाचा अस्त  होतो हे 23 मेला तुम्हाला कळेल असं प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार  उदय सामंत यांनी दिली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना रत्नागिरी विधानसभेत तीस हजाराच मताधिक्य मिळालं होतं तर युती नसताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले उदय सामंत सुमारे चाळीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. ते पाहता राऊत यांच्या मागे उभी असणारी सामंतांची राजकीय  ताकद कमी करणं हे या निवडणुकीतल निलेश राणेंसमोरचं प्रमुख आव्हान  असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...