शिवसेना म्हणते 'माझं तिच्यावर प्रेम आहे'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नवीन शिवसेना गीत तुमच्या भेटीला आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 12:57 PM IST

शिवसेना म्हणते 'माझं तिच्यावर प्रेम आहे'

मुंबई, 07 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेनं आता कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेनं नवीन गाणं लॉन्च केलं आहे. यामध्ये 'माझं तिच्यावर प्रेम आहे. आय लव्ह शिवसेना' असे बोल आहेत. दरम्यान, हे गाणं पाहिल्यानंतर शिवसेना बदलतेय अशीच प्रतिक्रिया अनेक जण देताना दिसत आहे. यापूर्वी देखील शिवसेना गीत गाजलं होतं. त्यामध्ये जात, गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना! शिवसेना! असे बोल होते. पक्षाच्या कार्यक्रमामध्ये अनेकवेळा हे गाणं वाजवलं जात असे. शिवाय, आज देखील अनेकवेळा हे गाणं वाजवलं जातं. पण, नवीन गाणं पाहता ते शिवसैनिकांच्या पसंतीला किती उतरेल हे पाहावं लागणार आहे. 2017मध्ये  पालिका निवडणुकांच्या दरम्यान देखील नवं शिवसेना गीत आलं होतं.


https://www.youtube.com/watch?v=9MYTNQt-RfU&feature=youtu.be


शिवसेनेची यापूर्वीची गीतं

Loading...


https://www.youtube.com/watch?v=UIwSr9X1fXE


https://www.youtube.com/watch?v=4AHew1QqXDo


आत्तापर्यंत शिवसेनेची साधारण दोन गीतं आली. त्यामधील आक्रमकपणा पाहता आता नवीन गीत शिवसैनिकांच्या पसंतीला कितपत उतरतं ते पाहावं लागणार आहे.


VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीनंतर पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...