झालं गेलं गंगेला मिळालं, आता मात्र साथ द्या - सुप्रिया सुळे

झालं गेलं गंगेला मिळालं, आता मात्र साथ द्या - सुप्रिया सुळे

'आता बहोत हुयी महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार'

  • Share this:

दौंड 4 एप्रिल : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूकीत लोकांनी वगळा कौल दिला होता. लोकांना आता कळून चुकलंय. दौंडमध्ये गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालं होतं. त्यामुळे झाले गेले विसरून या निवडणुकीत आघाडीला साथ द्या असं आवाहन राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

त्या म्हणाल्या, आताच्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा मुद्दा पुढे करत घोषणा दिल्या. मात्र त्यांच्या सत्तेचा पाच वर्षांचा काळ आणि त्यातील घडामोडी पाहता आता बहोत हुयी महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार असंच म्हणावं लागेल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय. त्याचवेळी सुषमा स्वराज यांनी विरोधक म्हणून केलेल्या भाषणाचा दाखला देत त्या म्हणाल्या, बुलेट ट्रेननं देशाचं पोट भरणार नाही, पण लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यानं जर संप केला तर सर्वांचे वांदे होतील हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधलाय.

याचवेळी त्यांनी दौंडमध्ये मागील निवडणुकीत झालेल्या कमी मताधिक्याबद्दल झालं गेलं गंगेला व्हायलं, त्यावर चर्चा न करता आता साथ द्या अशी भावनिक साद मतदारांना घातलीय.

संपत्तीत वाढ

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी मालमत्तेचं प्रतिज्ञापत्रही दाखल केलं. त्यात गेल्या पाचवर्षात त्यांच्या मालमत्तेत 67 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलंय.

सुप्रिया सुळे यांच्या यांच्या स्थावर मालमत्ता 18 कोटींच्या आहेत. त्यांच्या नावे एकही वाहन नाही. तर त्यांच्याकडे फक्त दीड लाख रुपयांचं सोनं आहे. सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे हे व्यावसायीक आहेत. त्यांची विदशतही गुंतवणूक आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

नरेंद्र मोदींवर टीका

''ज्यांना एकटं असण्याचा सार्थ अभिमान आहे, त्यांना काय नाती-गोती कळणार? नाती जपणं हे फार मोठ काम असंत. नाती तोडायला वेळ लागत नाही, जोडायला खूप वर्ष लागतात. गेल्या ५० वर्षा राज्यातल्या जनतेने शरद पवारांवर प्रेम केलं, विश्वास दाखवला त्याची जाणीव अजिद दादांना, मला आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे'', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरण्यापूर्वी पार पडलेल्या प्रचार सभेत त्यांनी नाव न घेता मोदींवर निशाणा साधला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 08:31 PM IST

ताज्या बातम्या