VIDEO कसलंही वारं आलं तरी बारामतीत पवारच - सुप्रिया सुळे

VIDEO कसलंही वारं आलं तरी बारामतीत पवारच - सुप्रिया सुळे

भाजप सरकारने जाहीरातींवर खर्च केले तब्बल 10 हजार कोटी

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती, 28 मार्च:  केंद्रातल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात  जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हेच पैसे जर जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं असही त्या म्हणाल्या. देशात आणि राज्यात कसलही वारं आलं तरी बारामतीत पवारच येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव आदी गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेट दौर्‍याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, मात्र स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी मोदी सरकारने हे पैसे खर्च केले आहेत. त्यामुळं अशा उधळपट्टीला आळा घालण्यासाठी नवीन लोकसभेत विधेयक मांडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

आजपर्यंत कोणाचीही हवा आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते.. असं सांगत त्यांनी कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या