• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मावळ गोळीबार प्रकरणी सेनेची पोस्टरबाजी; अजित पवार म्हणाले...
  • VIDEO: मावळ गोळीबार प्रकरणी सेनेची पोस्टरबाजी; अजित पवार म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 07:34 AM IST | Updated On: Apr 2, 2019 07:50 AM IST

    मावळ, 2 एप्रिल : राष्ट्रवादी सत्तेवर असताना शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराबाबत शिवसेनेने मावळमध्ये पोस्टरबाजी सुरू केली आहे. ''या प्रकरणाला आता पाच वर्ष पूर्ण झाली. या काळत केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता होती. पोलीस यंत्रणाच नव्हे, तर पालकमंत्रीसुद्धा तुमचेच होते. मग गेल्या पाच वर्षात या प्रकरणाची चौकशी का केली नाही?'' असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. ''मुळात 'शेतकरी' ही आमची जात आहे. लोकांनासुद्धा माहिती आहे तेव्हा काय घडलं होतं. सरकारनं आता फक्त त्या प्रकरणात काय निष्पन्न झालं याचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, तेव्हाच वस्तूस्थिती समोर येईल. या विषयावरून केवळ मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,'' असंही अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी