• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: अजित पवार म्हणाले... 'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'
 • VIDEO: अजित पवार म्हणाले... 'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'

  News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 03:21 PM IST | Updated On: Apr 6, 2019 03:27 PM IST

  मुंबई, 6 एप्रिल : ख्रिश्चन धर्मगुरूंचे आशिर्वाद घेतल्यामुळे पार्थ पवार ट्रोल झाले होते. त्यावर बोलताना ''पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही. माध्यमांनी त्याचा बाऊ करू नये'' असं अजित पवार म्हणाले. ''मी निवडणुकीला उभो होतो, तेव्हा मी सुद्धा त्याला अनेकदा देवळात, मशिदीत आणि चर्चमध्ये घेऊन गेलो होतो. त्याठिकाणी आम्ही नमस्कार करायचो आणि तेथून निघून यायचो. जे झालंय ते मलासुद्धा योग्य वाटत नाही'', असं अजित पवार म्हणाले. ''ती चूक माझ्याकडून झाली असती तर गोष्ट वेगळी असती. तो नवखा आहे, त्याचाकडून अजाणतेपणी ती चूक घडली'', असं अजित पवार म्हणाले.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी