S M L

नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली - राज ठाकरे

नरेंद्र मोदी यांनी देशाची फसवणूक केली अशा शब्दात राज यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

Updated On: Apr 16, 2019 09:21 PM IST

नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली - राज ठाकरे

इचलकरंजी, 16 एप्रिल : नरेंद्र मोदी यांनी देशाची फसवणूक केली. अमित शहा, नरेंद्र मोदी देशाला कलंक आहेत. देशाच्या राजकीय क्षितीजावरून अमित शहा, नरेंद्र मोदी नष्ट झाले पाहिजेत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. तर, पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांबद्दल नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला. आपल्या जाहीर सभेत अमित शहा, नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडीओ दाखवत राज यांनी काय झालं या आश्वासनाचं? असा सवाल केला. तर, देश स्वतंत्र झाल्यानंतर पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला. तसेच पत्रकारांना सामोरं जायला नरेंद्र मोदी घाबरत असल्याची टीका देखील यावेळी राज यांनी केली.


...म्हणून प्रचार सभा


देशावरील मोदी, शहा यांचं संकट दूर व्हावं म्हणून मी राज्यभर प्रचार सभा घेतोय. तर, माझ्या सभांचा खर्च हा आम्हीच ( मनसे ) करत असल्याचं राज यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोण करतंय? असा सवाल केला जात होता. भाजपनं निवडणूक आयोगाकडं त्याची तक्रार देखील केली होती. त्यावर आता राज ठाकरे यांनी आपली बाजू मांडली आहे.


पंकजा मुंडेंना धक्का, ...आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत!

Loading...


देशातील लोकशाही संकटात

देशातील लोकशाही संकटात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्रकार परिषद का घ्यावी लागते? असा सवाल यावेळी राज यांनी केला. तसेच यावेळी राज यांनी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचा उल्लेख करत अमित शहा यांना लक्ष्य केलं.


नोटाबंदीचा हेतू चांगला नव्हता

नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय हा एका रात्रीत घेतला. नोटाबंदीच्या निर्णयाची आयबीआरला देखील माहिती नव्हती. असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. तर, भाजपनं काळ्यापैशाबद्दल न बोलता नोटाबंदीनंतर देखील त्यांच्याकडे पैसा आला कुठून? असा सवाल केला. नोटाबंदीमुळं बेरोजगारी वाढल्याचं राज यांनी म्हटलं. शिवाय, मोदींनी जाहीरातींवर 4500 कोटी रूपये खर्च केले असा आरोप देखील राज यांनी केला. जेट एअरवेज कुणामुळे डबघाईला आली? असा सवाल करत राज यांनी सरकार आर्थिक आघाड्यांवर देखील अपयशी ठरत असल्याचं म्हटंल.


बक्कळ पैसा वापरल्याने इथे निवडणूकच झाली रद्द, आयोगाची कारवाई


गंगा स्वच्छतेचं काय झालं?

यावेळी गंगा स्वच्छ करणार होता त्याचं काय झालं? गंगा स्वच्छतेसाठी दिलेले 20 हजार कोटी गेले कुठं? स्वच्छ भारतसाठी कर घेतला, मग स्वच्छता आहे कुठं? असा सवाल राज यांनी केला.


प्रचारासाठी जवानांचा वापर का?

यावेळी बोलताना राज यांनी प्रचारासाठी जवानांचा नावाचा वापर का करता? असा सवाल करत उरी, पॅडमॅन चित्रपट सरकार पुरस्कृत असल्याचं म्हटलं.तसेच हिटलरचं तंत्र आता वापरलं जात असल्याचा पुर्नउच्चार राज ठाकरे यांनी केला.


VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 09:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close