कोकणात नारायण राणेंच्या पराभवामागे ही आहेत कारणं

कोकणात नारायण राणेंच्या पराभवामागे ही आहेत कारणं

कोकणात नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. राणेंचा बालेकिल्ला आता त्यांचा राहिला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

  • Share this:

रत्नागिरी, दिनेश केळुसकर, 24 मे : रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणे यांनी निलेश राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचं लक्ष होतं. राणेंच्या राजकीय अस्तित्वासाठी देखील ही निवडणूक महत्त्वपूर्ण होती. पण, पराभवामुळे नारायण राणेंची पुढील राजकीय कारकीर्द कशी असणार? त्यांच्या पराभवाची कारणं काय? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी सलग दुसऱ्यांदा निलेश राणेंचा 1 लाख 78 मतांनी पराभव केलाय. त्यामुळे राणेंचा बालेकिल्ला आता त्यांचा राहिला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. 2014पेक्षा जास्त मतं विनायक राऊत यांनी यावेळी मिळवली आहेत.


महाराष्ट्रात मोदी लाटेसहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचाही चालला करिश्मा

रत्नागिरी जिल्ह्यात राणेंच्या कार्यकर्त्यांचे जाळे नाही

Loading...

शिवसेनेचं एकहाती वर्चस्व असलेल्या रत्नागिरीत जिल्ह्यात नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचं जाळ नाही. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्ष वाढीसाठी राणेंन प्रयत्न केलं. पण, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मात्र नारायण राणेंना आपला जम बसवता आला नाही.

सिंधुदुर्गातही राणेंनी विश्वास गमावला

एकीकडे कोकणात 2014प्रमाणे यावेळी ॲन्टी राणे लाट नसताना आणि दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा असहकार असतानाही विनायक राऊत यांना 2014च्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळालंय. विशेष म्हणजे राणेंचे दुसरे पुत्र नितेश राणे आमदार असलेल्या कणकवली विधानसभा मतदार संघात निलेश राणेंना जेमतेम दहा हजारांच्या मताधिक्यांवर रोखण्यात शिवसेनेला यश आलंय.त्यामुळे राणेंचा निकालाबबतचा हेराफेरीचा आरोप राऊत यांनी धुडकावून लावला आहे.


राज्यात सेना – भाजपच्या विजयाची ही आहेत सहा कारणं

निलेश राणेंची बेताल, अर्वाच्य टीका

माजी खासदार निलश राणे यांची बेताल आणि अर्वाच्य टीका हे देखील पराभवामागील एक प्रमुख कारण आहे.

राणेंच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर नवख्या असलेल्या पक्षात पदाधिकाऱ्यांची नाराजी देखील दिसून आली. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला.


मोदी त्सुनामीपुढे विरोधकांचं पानिपत, यासोबत महत्त्वाच्या इतर 18 घडमोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 11:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...