S M L

महाराष्ट्र : यंदाची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांनी गाजली?

मतदान संपल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 04:06 PM IST

महाराष्ट्र : यंदाची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांनी गाजली?

मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीत सर्व सात टप्प्यांतील मतदान आज संपत आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक मुद्दे गाजल्याचं पाहायला मिळालं. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केल्याचंही चित्र होतं. यात काही मुद्दे अधिक लक्षवेधी ठरले.

पश्चिम महाराष्ट्र

यावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला.


पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा असून त्यामध्ये नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत युतीनं उत्तर महाराष्ट्रात एकहाती विजय मिळवत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सगळ्या जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे.

Loading...

कोकण

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांच्याकडे विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं?

मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला देशभरात ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं होतं. भाजप-शिवसेनेनं मोठी झेप घेतली होती. दुसरीकडे, तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन अंकीही जागा मिळवता आल्या नव्हत्या.

कुणाला किती जागा मिळाल्या?

भाजप - 23

शिवसेना - 18

राष्ट्रवादी - 4

काँग्रेस - 2

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

2009 च्या निवडणुकीत काय चित्र होतं?

या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेली युपीए दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात होती. पण या निवडणुकीत युपीएला अॅन्टीइन्कम्बन्सीचा फारसा काही फटका बसला नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चांगली कामगिरी केली.

कुणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेस- 17

राष्ट्रवादी - 8

शिवसेना - 11

भाजप - 9

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

बहुजन विकास आघाडी - 1

अपक्ष - 1



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2019 03:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close