News18 Lokmat

हिंगोलीत आजी -माजी शिवसैनिकांमध्ये होणार थेट लढत

काँग्रेसकडून यावेळी सेनेचेच माजी खासदार सुभाष वानखेडे मैदानात आहेत. विशेष म्हणजे ते भाजप रिटर्न आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 10:25 PM IST

हिंगोलीत आजी -माजी शिवसैनिकांमध्ये होणार थेट लढत

कन्हैय्या खंडेलवाल, 4 एप्रिल :  हिंगोलीहिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माघार घेतल्याने तिथं आता आजी - माजी शिवसैनिकांमध्येच थेट लढत होणार आहे. काँग्रेसतर्फे माजी खासदार सुभाष वानखेडे मैदानात आहेत तर सेनेतर्फे हेमंत पाटील मैदानात आहेत. वानखेडे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत.

काँग्रेसचा उमेदवार भाजप रिटर्न

हिंगोली लोकसभा मतदार संघ हा तसा विदर्भ ते पार तेलंगाणाच्या सीमेपर्यंत विस्तारलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भातले काही तालुके मिळून हा मतदारसंघ तयार झालाय. यामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत तर नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव तर विदर्भाचा उमरखेड अशा सहा तालुक्यांचा समावेश होतो. त्यामुळे उमेदवारांची प्रचार करताना मोठी दमछाक होतेय. काँग्रेसकडून यावेळी सेनेचेच माजी खासदार सुभाष वानखेडे मैदानात आहेत. विशेष म्हणजे ते भाजप रिटर्न आहेत. त्यांना खरंतर सेनेची उमेदवारी हवी होती. पण मातोश्रीने नकारघंटा दाखवल्याने त्यांनी सरतेशेवटी काँग्रेसचा रस्ता धरला. विद्यमान खासदार राजीव सातव यांनीच त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणल्याचं बोललं जातंय.

सामना रंगणार

सुभाष वानखेडे सेनेवर आरोप करत असले तरी हेमंत पाटलांना हा आरोप मान्य नाही. हिंगोली मतदारसंघातले कट्टर शिवसैनिक गद्दारांना नक्कीच धडा शिकवतील, असा दावा त्यांनी केलाय.

Loading...

हिंगोलीतून हे दोन आजीमाजी सैनिक समोरासमोर उभे ठाकलेले असतानाच बंजारा समाजाचे मोहन राठोडही वंचित बहुजन आघाडीतर्फे शड्डू ठोकून उभे आहेत.


हिंगोली मतदारसंघात लोकसभेसाठी सेना-भाजपची युती झाली असली तरी जिल्हा परिषदेत मात्र सेना आणि काँग्रेस आघाडी सत्तेमध्ये तर भाजप विरोधी बाकांवर बसलीय. त्यामुळे ही युतीवाले किती एकदिलाने काम करणार हा प्रश्नच आहे. अशातच नांदेडचे दोन तालुके या मतदारसंघात येत असल्याने अशोक चव्हाण कोणाला मदत करतात यावरही बरंच काही अवलंबून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 10:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...