देशाला वाचवायचं असेल तर मोदींना गुजरातमध्ये परत पाठवा-हार्दिक पटेल

भाजप निवडणूक जिंकण्यासाठी लोकसभा मतदार संघ 15-20 कोटी खर्च करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 07:06 AM IST

देशाला वाचवायचं असेल तर मोदींना गुजरातमध्ये परत पाठवा-हार्दिक पटेल

मुंबई 7 एप्रिल : गुजरातचे काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी रविवारी मुंबईत संजय निरूपम आणि उर्मिला मार्तोंडकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्टेग केलं. देश वाचवायचा असेल तर मोदींना दिल्लीतून पुन्हा गुजरातमध्ये पाठवा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. हार्दिक पटेल म्हणाले, भाजपा निवडणूक जिंकण्यासाठी लोकसभा मतदार संघ 15-20 कोटी खर्च करत आहे. देशातले युवक भाजपवर नाराज असल्याचंही ते म्हणाले, पाच वर्षात काम केले हे सांगण्याऐवजी भारत पाक, राष्ट्रवाद देशद्रोह हे विषय काढले जातात असंही ते म्हणाले. या जगात इतर ठिकाणी निवडणुकीत चौकीदार, चहावाला हे सांगणार कोण? पंप्रधानांनी सुरक्षा,आरोग्य, शिक्षण यावर बोलले पाहिजे पण पंतप्रधान यावर बोलतच नाही अशी टीकाही त्यांनी केली.

तर संजय निरुम म्हणाले, युवकांचे हाल मोदी सरकारने केले. युवकांवर देशद्रोह खोटे खटले टाकले जात आहेत. या सरकारने शिक्षणाचा बजेट कमी केला, शेतकरी वर्ग निराश झाला आहे.

मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांची बदली

मुंबईचे सहपोलीस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.

देवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 11:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...