• VIDEO: असा आहे हंसराज आहिर यांचा 'शेतकरी अजेंडा'

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 09:16 AM IST | Updated On: Apr 7, 2019 09:54 AM IST

    भास्कर मेहेरे, चंद्रपूर, 7 एप्रिल : ''मोदी सरकार आल्यापासून देशातला शेतकरी संपन्न होत चालला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी या सरकारने उत्तम प्रयत्न केले आहेत. खतांचे भाव न वाढू देता, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव वाढवून दिला आहे. याशिवाय शेतकरी कर्जबाजारातून मुक्त होऊ शकत नाहीत. सर्वांन सिंचन देण्याची जबाबदारी सरकारची असते, पण गेल्या 70 वर्षात काँग्रेसने सिंचनच्या प्रश्नावर अजिबात काही केलं नाही. शेततळी देणं, विहिरी देणं, जलयुक्त शिवार अशा विविध योजना मोदी सरकारने राबविल्या आणि सिंचनाचा प्रश्न सोडवला. मुबलक खताचा पुरवठा आणि दर्जेदार बियाण्यांचीही पूर्तता मोदी सकरकानेच केली'', असं केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चंद्रपूर-चिमूर मतदारसंघाचे उमेदवार हंसराज अहिर म्हणाले. ''आम्ही अजिबात दिखावा केला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्नांना प्राधान्य दिले आहे'', असंही ते म्हणाले.

    ताज्या बातम्या

    और भी

    फोटो गॅलरी