माझ्याकडे निवडणूक जिंकण्याचं 'टेक्निक' - गिरीश महाजन

अनिल गोटे यांनी डिपॉझिट वाचून दाखवावं असं आव्हानही गिरीश महाजन यांनी दिलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 08:08 PM IST

माझ्याकडे निवडणूक जिंकण्याचं 'टेक्निक' - गिरीश महाजन

जळगाव, 11 एप्रिल : आपल्याकडे निवडणूक जिंकून येण्यासाठी टेक्निक आहे असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. महाजन हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची कायम चर्चा होते असते. या आधीही त्यांनी आता बारामतीही जिंकू असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्याचीही राज्यात चांगलीच चर्चा झाली होती.

महाजन म्हणाले, आपल्याकडे निवडणूक जिंकून येण्याची टेक्निक आहे. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदाता जागृत कसा करावा याची आपल्याला कल्पना आहे. साहित्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो आणि कामाला गती येते अशा प्रकारे आपल्याला निवडणुका जिंकता येतात असा  दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

अनिल गोटे यांनी डिपॉझिट वाचून दाखवावं असं आव्हानही गिरीश महाजन यांनी जळगाव येथे मेळाव्यादरम्यान केलं होतं. महाजन म्हणाले, धुळे येथे अनिल गोटे यांच्या गल्लीत जाऊन आपण अनिल गोटे यांच्या घरासमोर सांगितलं आहे की अनिल गोटे यांनी आपले डिपॉझिट वाचून दाखवावं.

शिवसेना-भाजप यांच्यामध्ये वाद नाही फक्त पाचोरा येथे वाद होते मात्र ते सुद्धा आता मिटल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मागील निवडणुकीमध्ये सुरेश जैन यांच्या विरोधात आपण लढलो मात्र त्यांच्या विषयी आपल्या मनामध्ये आदरच आहे असंही ते म्हणाले.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की आम्ही साडेचार वर्ष आपसात निवडणुका लढल्या काही फरकाने हरलो जिंकलो मात्र देशाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. देवेंद्र फडणीस व उद्धव ठाकरे यांनी देशाच्या हितासाठी एकत्र येण्याचं सांगितलं आणि आता आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...