News18 Lokmat

मुंबईत 46 लाखांची रोकड जप्त; कुठं नेली जात होती रक्कम?

भायखळा येथे 46 लाख 21 हजाराची संशयित रक्कम पकडण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 12:27 PM IST

मुंबईत 46 लाखांची रोकड जप्त; कुठं नेली जात होती रक्कम?

मुंबई, 24 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशात सुरू आहे. आत्तापर्यंतच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दरम्यान, मतदानादरम्यान पैसे वाटले जात नाही ना? मतदारांना आमिष दाखवलं जात नाही ना? या दृष्टीनं देखील निवडणूक आयोग सतर्क आहे. दरम्यान, मुंबईतील भायखळा येथे निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकानं 46 लाख 21 हजाराची संशयित रक्कम पकडली आहे. याबाबत आता आयकर विभाग अधिक चौकशी करत आहे.

रोहित तिवारी हत्येप्रकरणी पत्नी अपूर्वा शुक्ला अटकेत

केव्हा झाली कारवाई?

मंगळवार 23 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी ही रक्कम जप्त करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवा महल, बी.जे.मार्ग ,सात रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली. एम.एच.03 बी. सी. 312 या वाहनातून की कारवाई करण्यात आली. याप्रकरणामध्ये ईश्वर सोलंकीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सध्या अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची चौकशी केली जात आहे. यापूर्वी राज्यातील काही ठिकाणी देखील रोकड जप्त करण्यात आली आहे.

Loading...

VIDEO: मतदानाला गालबोट, कोल्हापुरात पोलीस-शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...