पवार कुटुंबीयांनी मांडला शिक्षणाचा बाजार - नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी मांडला शिक्षणाचा बाजार - नितीन गडकरी

'नुसत्या फुगड्या खेळणारा, चष्मे, काठ्या वाटणारा खासदार नको.'

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तीसऱ्या टप्प्याचा प्रचार रविवारी संपला. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि रविवार असल्याने सर्वच बड्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंजवडी इथं झालेल्या प्रचार सभेत शरद पवारांवर जोरदार टीका केली. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने गडकींनी पवारांना टार्गेट केलं.

पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा  गोरख धंदा मांडलाय अनेक शाळा काढल्या आणि पैसा कमावला असा आरोपही नितीन गडकरी यांनी केला. विजयाची खात्री नसल्यानेच पवारांनी निवडणुकीतून पळ काढला असही ते म्हणाले.

गडकरी म्हणाले, कॉग्रेस-राष्ट्रवादीची सगळी अर्धवट कामं आम्हाला करावी लागत आहेत. म्हणजे लग्न झालं राष्ट्रवादी काँग्रेसचं. त्यांना मुलं झाली त्यांना आणि त्यांचे आई बाबा गेले पळून आणि त्यांची मुलं आता आम्हालाच बाबा म्हणून चिकटली आहेत. सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो आहोत. ही कामं अर्धवट ठेवण्याचं पाप राष्ट्रवादीने केलं असा आरोपही त्यांनी केल.

फुगड्या खेळणारा खासदार नको

या प्रचार सभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सुप्रिया सुळे माझ्याकडे पवार पब्लिक स्कुल च्या परवानगी मागायला येतात. त्यांच्या सगळ्या शाळा शहरात आणि इंग्रजीत. खेड्यात शाळा काढायच्या नाही आणि मग आमच्या नावाने शिक्षणाचा बोऱ्या वाजवला म्हणून ओरडायच हा दुट्टपी पणा आहे. नुसत्या फुगड्या खेळणारा, चष्मे, काठ्या वाटणारा  खासदार नकोय अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या