कुंदन जाधव, अकोला 11 एप्रिल : विदर्भात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केलीय. तर निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरणही चांगलच तापलंय. अकोल्यात युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या पाच पिढ्या गरिबी हटाओची घोषणा करत आहेत. मात्र काँग्रेसची गरिबी हटली, गरीबांची नाही अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या पाच पिढ्यांनी गरिबी हटविण्याची घोषणा केली. आता राहुल गांधीही तीच घोषणा करत आहेत. मात्र या देशातला गरीब तसाच राहिला. काँग्रेसचे नेते मात्र श्रीमंत झाले अशी टीकाही त्यांनी केला. टीव्ही सिरियल्समध्ये सुरुवातीला ज्या प्रमाणे दाखवतात ही कथा काल्पनिक आहे त्याच प्रमाणेच राहुल गांधीच भाषण सुरू होण्याआधी तसच दाखवलं पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.
पुलवामा मध्ये एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानातले अड्डे नष्ट केले पण दोघांनीच विचारलं पुरावा द्या म्हणून एक पाकिस्तान आणि दुसरं काँग्रेस. आम्हाला आधी माहीत असत तर रॉकेटला काँग्रेसचा नेता बांधून पाठवला असता असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांवर निशाणा
वंचित बहुजन आघाडीला आपण बघितलं आहे, आंबेडकरांचं एकच धोरण आहे मोदींना शिव्या देणं. आघाडीचं नाव वंचित असेलं तरी पण वंचितांसाठी काम मोदींनी केलं आहे. विदर्भातल्या सात जागांसाठी गुरुवारी मतदान झालं. तर अकोल्यात 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूरसोबतच अकोल्यातूनही निवडणूक लढवत आहेत. अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा गढ समजला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबतच प्रकाश आंबेडकरांवरही निशाणा साधला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा