News18 Lokmat

'आधी मी पाणी पितो मग काँग्रेसला पाजतो'

'काँग्रेस वाले म्हणजे धादांत खोटारडे, राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे केवळ मनोरंजन.'

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 10:02 PM IST

'आधी मी पाणी पितो मग काँग्रेसला पाजतो'

शेख मुजीब नांदेड 11 एप्रिल : निवडणुकीतलं भाषण म्हणजे जोष आणि आवेश असतो. जाहीर सभांमध्ये बोलताना जास्त आक्रमक असावं लागतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभांमध्ये आक्रमक भाषणं करत असतात. नांदेडमध्ये गुरुवारी झालेल्या सभेत भाषण करताना मुख्यमंत्र्यांना तहान लागली. तेव्हा थोडं थांबत मुख्यमंत्री म्हणाले, आधी मी पाणी पितो आणि मग काँग्रेसला पाणी पाजतो. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

राहुल गांधींचे आजोबा चांगले व्यक्ती होते, त्यांच्यापासून गरिबी हटाव चा नारा सुरू झाला जो अजून आहे.

मोदींनी काळा पैसा तिजोरीत आणला आणि हे काँग्रेसवाले त्याच्या भरवशावर 72 हजार ची योजना सांगत आहेत.

Loading...

काँग्रेस वाले म्हणजे धादांत खोटारडे, राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे केवळ मनोरंजन.

अशोक चव्हाणांना आव्हान देतोय मागील 15 वर्षात तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 350 कोटी दिले आणि आमच्या सरकारने 2 हजार 226 कोटी दिले आहेत.

मराठवाड्यात 13 हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत.

पाकिस्तानला खबरदार एवढे म्हणण्याची हिंम्मत, धमक काँग्रेसमध्ये नव्हती. पाकिस्तान हा कत्र्याच्या शेपटी सारखा आहे वाकडा तो वाकडाच

अमेरिका आणि इस्रायल हे 2 देश जगात असे होते जे त्यांच्या सैन्यावरील हल्ला कोणत्याही स्थितीय खपून घ्यायचे नाहीत.  आता या रांगेत तिसरा देश आलाय तो आपला भारत देश आहे.

ही निवडणूक विकास आणि गरिबी एव्हढ्यापुर्ती मर्यादित नाही तर राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...