नरेंद्र मोदींच्या 'हिंदू दहशतवादा'वर सुशीलकुमार शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरलंय त्यामुळे त्यांना आता जुने विषय आठवत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 05:31 PM IST

नरेंद्र मोदींच्या 'हिंदू दहशतवादा'वर सुशीलकुमार शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सोलापूर 1 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातल्या आपल्या पहिल्याच प्रचार सभेत 'हिंदू दहशतवादा'वरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, 'हिंदू दहशतवाद ही आता जुनी गोष्ट झालीय. त्यानंतर भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने ते आता जुने विषय बाहेर काढत आहेत'' अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची स्थिती विदारक आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे त्यांना आता जुने विषय आठवत असल्याचंही ते म्हणाले. राहुल गांधी हे  दोन जागांवरून निवडणूक लढवत असल्याची टीका भाजप करत आहे. पण 2014 ची स्थिती त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यावळी मोदींनी का दोन जागांवरून निवडणूक लढवली? असा सवालही त्यांनी केला.

मोदी काय म्हणाले?

वर्ध्यातील जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी 'हिंदू दहशतवाद' या शब्दावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "हिंदूंना बदनाम करण्याचं पाप हे काँग्रेसनं केलं आहे. काँग्रेसमुळे हिंदू बदनाम झाले," असं सांगत 'हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? हे पाप कुणी केलं? असा सवालही मोदींनी उपस्थितांना केला. यावरून पुन्हा एकदा हिंदू दहशतवाद या शब्दावर चर्चा सुरू आहे.  नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर 'हिंदू दहशतवाद' हा शब्द आला कुठून? आणि सुशीलकुमार शिंदे यांचा काय संबंध हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे.

शिंदेंचा काय संबंध?

Loading...

जानेवारी 2013मध्ये जयपूर इथे बोलताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केले होते. आरएसएसच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जातं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर आक्रमक होत भाजपनं सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र डागलं. शिवाय शिंदेंनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. त्यानंतर वाढता दबाव पाहता सुशीलकुमार शिंदे यांनी माघार घेतली. 'मी दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडलं नाही. तसेच 'हिंदू दहशतवाद' असा उल्लेख न करता 'भगवा दहशतवाद' असं म्हटलं होतं. पण, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला', असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं. शिंदे यांच्या याच विधानावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.

शरद पवार आणि भगवा दहशतवाद

दरम्यान, 10 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालेगावच्या घटनेसाठी भगवा दहशतवाद हा शब्द मी वापरला होता असं म्हटलं होतं.

VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 05:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...