लोकसभा 2019: काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, अशी आहे नवी यादी

लोकसभा 2019: काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, अशी आहे नवी यादी

लोकसभा निवडणुकीसाठीची काँग्रेसची यादी जाहीर झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठीची काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीतल एकूण 10 उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील 4 नावे महाराष्ट्रातील आहेत. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत काँग्रेसने अकोलामधून हिदायत पटेल यांना, रामटेक येथून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसच्या आजच्या यादीतील धक्कादायक घोषणा म्हणजे याआधी चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द करत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आमदारकीचा राजीनामा देणारे सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता चंद्रपूरमधून भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर अशी लढत पाहायला मिळेल. त्याच बरोबर काँग्रेसने हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसच्या चार उमेदवारांची यादी जाहीर

अकोला- हिदायत पटेल

रामटेक -किशोर गजभिये

चंद्रपूर - सुरेश धानोरकर

हिंगोली - सुभाष वानखेडेयाआधी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसरी यादी शनिवारी रात्री जाहीर केली होती. तिसऱ्या यादीत यादीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर होती. काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा देशभरातील एकूण 38 जणांची नाव जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून फक्त अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश होता.

काँग्रेसचे सर्व उमेदवार

पहिली यादी

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

दुसरी यादी

नंदूरबार - के. सी. पडवी

धुळे - कुणाल रोहिदास पाटील

वर्धा - चारूलता ठोकस

यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे

दक्षिण-मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड

शिर्डी - भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी - नविनचंद्र बांदिवडेकर

तिसरी यादी

नांदेड- अशोक चव्हाण

चौथी यादी

अकोला- हिदायत पटेल

रामटेक -किशोर गजभिये

चंद्रपूर - सुरेश धानोरकर

हिंगोली - सुभाष वानखेडे


VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या