VIDEO 'वसंतदादा पाटील घराण्याची वाट काँग्रेस-राष्ट्रवादीनेच लावली'

VIDEO 'वसंतदादा  पाटील घराण्याची वाट काँग्रेस-राष्ट्रवादीनेच लावली'

'काँग्रेसमध्ये अपमान सहन करत किती दिवस राहता.भाजपमध्ये आलात तर पायघड्या घालून तुमचे स्वागत करू.'

  • Share this:

सांगली 28 मार्च : लोकसभेच्या मतदानाला काही दिवस शिल्ल्क असतानाच काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसलाय. आता महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक पाटीलांवरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलाय.

प्रतिक पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील यांचे नातू आहेत. सांगलीची जागा काँग्रेस राजू शेट्टी यांच्यासाठी सोडत असल्याने प्रतिक पाटील हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच वसंतदादा घराण्याची वाट लावली अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

काँग्रेसमध्ये अपमान सहन करत किती दिवस राहता. अपमान सहन करू नका, तुम्ही भाजपमध्ये आलात तर पायघड्या घालून तुमचे स्वागत करू असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या