S M L

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही, पक्षाने झटकले हात

'साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करायची किंवा काय याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेते घेतील.'

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 05:56 PM IST

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही, पक्षाने झटकले हात

मुंबई 19 एप्रिल : भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या विधानावरून शुक्रवारी जोरदार वादळ निर्माण झालंय. भाजपने शहीदांचा अपमान केला अशी टीका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी केलीय. भाजपचा खरा चेहेरा उघड झाला असा आरोपही त्यांनी केलाय. याच सगळ्या प्रश्नांची वादळी चर्चा झाली 'न्यूज18 लोकमत'च्या आजच्या 'बेधडक' या कार्यक्रमात. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुरुवातीलाच या प्रश्नाबद्दल पक्ष सहमत नसल्याचं सांगितलं. केंद्रीय नेते साध्वींना योग्य ती समज देतील असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, भाजपचे केशव उपाध्ये, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि पत्रकार बाळा कृष्णन यांनी सहभाग घेतला.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर


भाजपचा संबंध नाही

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसून त्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. 26/11च्या हल्ल्यात जे पोलीस अधिकारी शहीद झाले ते शहीदच आहेत असं भाजपचं मत आहे अशी भूमिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मांडली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं असं असतानाही त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध का खटला दाखल केला नाही असा सवाल उपाध्ये यांनी केला.

बॉम्ब स्फोटात वापरलेली मोटरसायकल ही साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅप टॉपमध्ये मोहन भागवत यांच्या हत्येचा कटही सापडला होता. त्यावेळी भाजपचे नेते अभिनव भारतवर बंदी घालण्याची मागणी करत होते. नंतर मोदी आणि शहा आल्यानंतर परिस्थिती बदलली असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Loading...

राजकीय वाद

हेमंत करकरे शहीद झाल्यानंतर काही वर्षातच त्यांच्या पत्नी जग सोडून गेल्या त्यानंतर त्यांची मुलं परदेशात स्थायिक झाली. त्यांच्या मुलांना भारत सोडून जावं लागलं. आणि ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप झाले त्यांना भाजपने उमेदवारी दिली हे अतिशय दुर्दैवी आहे असं मत माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले. त्यांनी या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वातावरण चांगलच तापलं.


मानवाधीकाराचं काय?

ज्येष्ठ पत्रकार बाळा कृष्णन म्हणाले, 26/11 च्या घटनेत शहीद हेमंत करकरे शहीद झाले ती घटना आणि साध्वींच प्रकरण वेगळं आहे. साध्वींचा आणि कर्नल पुरोहित यांचा  कोठडीत अनन्वित छळ करण्यात आला होता. मानवाधिकाराच्या सर्व नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी उद्विग्नदेतून हे विधान केलं असावं असं कृष्णन म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्याल जोरदार आक्षेप घेतला.

हा तर शहीदांचा अपमान

भाजपने शहीदांचा अपमान केला आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. त्यावेळी हा खटला चालविणाऱ्या वकील रोहिणी सालियन यांनी खटले धीमा गतीने चालवावा असा आपल्यावर दबाव होता असं वक्तव्य केलं होतं असंही ते म्हणाले.

काय म्हणाल्या प्रज्ञासिंह

मध्य प्रदेशमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी दिली आणि वाद सुरू झाला. त्यातच आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेतली.

हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असं साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती.

साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असं या पथकाने म्हटलं होतं पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते याची आठवण साध्वी यांनी करून दिली. तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 05:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close