News18 Lokmat

Lok Sabha Election 2019: 'या' तारखेला जाहीर होणार भाजप उमेदवारांची पहिली यादी

या पहिल्या यादीत १७/१८ जागांचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजूनही ५/६ जागांच्या नावांवर अजूनही तिढा कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2019 06:59 PM IST

Lok Sabha Election 2019: 'या' तारखेला जाहीर होणार भाजप उमेदवारांची पहिली यादी

मुंबई, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजपनं देखील तयारी सुरू केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार आहे. १६ मार्चला भाजपची राज्यातील पहिली उमेदवार यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या पहिल्या यादीत १७/१८ जागांचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजूनही ५/६ जागांच्या नावांवर अजूनही तिढा कायम आहे. त्यामुळे भाजपच्या या पहिल्या यादीत कोणत्या दिग्गज उमेदवारांची नावं पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. सोलापूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नांदेड, हिंगोली आदी लोकसभा मतदारसंघात नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील लक्ष घातलं आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहरे हे भाजपच्या वतीनं लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

खासदारांच्या कामगिरीचा घेतला आढावा

Loading...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपनं खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. त्यांच्या कामांचं मुल्यमापन केलं होतं. परिणामी आता पत्ते कट होणारे ते खासदार कोण? अशीही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : '...अन्यथा शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन'

लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यातून 45 जागा निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. 2014मध्ये शिवसेना - भाजप युतीला 42 जागा जिंकता आल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 2014 प्रमाणे यश मिळेल का नाही? याबद्दल शंका आहे. त्यामुळे आता भाजपनं देशातील उर्वरित राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

सध्या अनेक पक्षांमध्ये जोरदार घडामोडी घडताना दिसत आहे. काँग्रेसनं देखील आपल्या काही उमेदवारांची नावं यापूर्वी जाहीर केली आहेत. दरम्यान, लवकरच भाजप देखील उमेदवारांची नाव जाहीर करणार आहे.

राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर, ही आहे संपूर्ण यादी

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. यात 12 जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. मात्र सर्वाधिक चर्चेत असलेल्या मावळ आणि माढा या दोन मतदारसंघातली नावे मात्र पहिल्या यादीत जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे.

रायगड- सुनील तटकरे

बारामती- सुप्रिया सुळे

सातारा- उदयनराजे भोसले

ठाणे- आनंद परांजपे

जळगाव- गुलाबराव देवकर

बुलढाणा- राजेंद्र शिंगणे

परभणी- राजेश विटेकर

उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील

कल्याण- बाबाजी पाटील

कोल्हापूर- धनंजय महाडिक

लक्षद्विप- मोहम्मद फैझल

VIDEO : खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी - विजय शिवतारे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...