News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी एकनाथ शिंदेंनी टोचले पाटलांचे कान
  • VIDEO: कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी एकनाथ शिंदेंनी टोचले पाटलांचे कान

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 12:49 PM IST | Updated On: Apr 4, 2019 12:57 PM IST

    भिवंडी, 4 एप्रिल : भिवंडीत कपिल पाटील हे युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण गेल्या 5 वर्षातल्या त्यांच्या कारनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण या दोघांचा चांगलाच कस लागतोय. जागा हातची जाऊन नामुष्की ओढावेल या भीतीनं दोन्ही मंत्री कामाला लागलेत. तर कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी वरीष्ठ नेत्यांकडे त्यांच्याविषयी उघड उघड नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे आधी त्यांची नाराजी दूर करणे आणि आता पाटलांना निवडूण आणणे हे आव्हान एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण या दोन्ही मंत्र्यांसमोर आहे. एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी पाटलांचे कान टोचले. तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी या एकमेव मतदारसंघात भाजपचा उमेदवार असल्याने रविंद्र चव्हाणांनी कंबर कसली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी