धनंजय मुंडेंना परळीत धक्का, पंकजा मुंडे यांनी पाडलं काँग्रेसला खिंडार

धनंजय मुंडेंना परळीत धक्का, पंकजा मुंडे यांनी पाडलं काँग्रेसला खिंडार

राजेश देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने परळीच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या धनंजय मुंडे यांना धक्का बसल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 4 एप्रिल : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधलं आउटगोईग अजुनही थांबलेलं नाही. पक्ष सोडणारे  नेतृत्वाच्या कारभाराला कंटाळून पक्षांतर करत असल्याचं बोलून दाखवतं आहेत. त्याचा फायदा मात्र भाजपला होत आहे. परळी शहरातील जिल्हा काँग्रेस समितीचे माजी सरचिटणीस आणि वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

देशमुख यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे परळीच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या धनंजय मुंडे यांना धक्का बसल्याचं बोललं जातंय. राजेश देशमुख हे विलासराव देशमुख यांचे मेहुणे आहेत. परळीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचं वजन आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी चेकमेट दिल्याचं म्हटलं जातं आहे.

गेल्या काही दिवसां मध्ये अनेकदा पक्षातलं अंतर्गत राजकारण आणि मतभेदांमुळे ते नाराज होते. परळी नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी चांगली मते घेवून अपक्ष म्हणून लढवली होती. वैद्यनाथ मंदिर देवस्थान समितीचे सचिव असलेल्या देशमुख यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदी विविध पदं भूषविलेली आहेत. प्रवेश होताच भाजपच्या प्रदेश कार्यसमितीवर चिटणीस म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

VIDEO : राहुल गांधींच्या समोर भुजबळांनी केली मोदींची मिमिक्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...