Elec-widget

निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का

निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बविआला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, उदय जाधव, 13 एप्रिल : लोकसभा निवडणुकीची धामधुम सध्या जोरात सुरू आहे. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीचं 'शिट्टी' हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे 'बविआ'ला मोठा धक्का बसला आहे. पालघरमध्ये बहूजन महापार्टीच्या उमेदवारानंही 'शिट्टी' या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र, या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहूजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टानं वाद निवडणूक आयोगाकडे सोपवत निर्णयाचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण, पडद्यामागून शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते आणि ‘मातोश्री’चे चाणक्य यांनी किल्ला लढवला. दरम्यान, पहाटे पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं कुणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बहूजन विकास आघाडीला बसणार आहे. तर, फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे.


काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीचा अपघात, डोक्याला दुखापत


निवडणूक आयोगाचा निर्णय शिवसेनेच्या पथ्यावर

Loading...

शिट्टी म्हणजे बविआ हे समीकरण. पण, निवडणूक आयोगानं 'शिट्टी' हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे मोठा धक्का बहुजन विकास आघाडीला बसला आहे. पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होत आहे. मात्र, मतदानापूर्वीच बहूजन विकास आघाडीचं ओळख असलेलं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाने गोठवलंय. निवडणूक आयोगाच्या या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहूजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता. मात्र, त्यानंतर देखील  'बविआ'ला फटका बसला. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला आता मतदारांकडे नवीन निवडणूक चिन्ह पोहोचवण्याची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, बविआनं याबद्दल अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...