शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केले हे वादग्रस्त वक्तव्य

शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केले हे वादग्रस्त वक्तव्य

चंद्रकांत खैरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी 'मातोश्री'वर भेट घेतली. आपला पराभव का आणि कसा झाला, याचा अहवाल दिला.

  • Share this:

मुंबई, 24 मे- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी अखेर चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.

मात्र, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. खैरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी 'मातोश्री'वर भेट घेतली. आपला पराभव का आणि कसा झाला, याचा अहवाल दिला. 'मातोश्री'वरील बैठक संपल्यावर चंद्रकांत खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही,' असे खैरेंनी सांगितले आहे. आता खैरेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर औरंगाबाद नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील काय प्रत्युत्तर देतात, हे पाहाणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे.

चंद्रकांत खैरेंना मारक ठरला 'जावई' फॅक्टर..

वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे त्रिकूट चंद्रकांत खैरेंच्या मानहानीकारक पराभवासाठी कारणीभूत ठरले आहे.

औरंगाबादमध्ये 'जावई' फॅक्टरमुळेही चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या आव्हानाचा खैरेंना 'सामना' करावा लागला. रावसाहेब दानवे यांनी जावईचा प्रचार केला, असा आरोपही खैरे यांनी केला होता. खैरे-दानवे वाद थेट मातोश्रीवरही पोहोचला होता.

..तरी खैरेंना मिळवता आले नाही यश!

ओबीसी मतदारांचे पाठबळ, हिंदुत्वाच्या मुद्या, कट्टर धार्मिक प्रतिमा, कट्टर शिवसैनिक एवढेच नाही तर ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक असतानाही चंद्रकांत खैरे यांना या निवडणुकीत यश मिळवता आले नाही.

काही नसताना इम्तियाज जलील यांनी खेचून आणली विजश्री!

आमदार इम्तियाज जलील हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. इम्तियाज जलील यांची केवळ मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून येणे शक्य नव्हते. मात्र, वंचित फॅक्टरदलित तशी कमीत होती.

औरंगाबादमध्ये MIM फॅक्टरचा परिणाम..

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा ताबा आहे. औरंगाबादमधीस एका विधानसभेची जागा मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIMच्यात ताब्यात आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे.

अनेक वर्षं सेनेचं वर्चस्व

-1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे.

- मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली.


SPECIAL REPORT: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:30 PM IST

ताज्या बातम्या