News18 Lokmat

सुजय विखेंबद्दल अजित पवारांनी केला हा मोठा गौप्यस्फोट!

राष्ट्रवादीच्या आडमुठी भूमिकेमुळेच काँग्रेस अडचणीत आली असं वातावरण निर्माण झाल्यामुळेच अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याचं बोललं जातं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 07:00 PM IST

सुजय विखेंबद्दल अजित पवारांनी केला हा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई 15 मार्च : सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सुजय विखेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितलं होतं. मात्र ते स्वत:च नको म्हणाले असा  गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय.आणि हे खोटं निघालं तर वाट्टेल ते करायला तयार असल्याचही ते म्हणाले.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरून सध्या राज्याच्या राजकारणात वातावरण तापलं आहे. विरोधीपक्ष नेत्याचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसचं नाक कापलं गेलं. जे मुलाला समजावू शकत नाहीत ते मतदारांना काय समजावणार असा टोलाही अजित पवारांनी लगावला होता. तर राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर ही परिस्थिती आली नसती असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं.

राष्ट्रवादीच्या आडमुठी भूमिकेमुळेच काँग्रेस अडचणीत आली असं वातावरण निर्माण झाल्यामुळेच अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याचं बोललं जातं आहे.

'शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतरच सुजयचा भाजप प्रवेश '


नगरच्या जागेवरुन हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला, असं बोलणं मुळात चुकीचे आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला मिळाली असती तर आघाडीची एक जागा वाढेल, हे त्यामागील गणित होतं, असे स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलं.

Loading...

काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितली होती. कारण, जास्त जागा जिंकाव्यात हेच यामागील गणित होतं, आम्ही आघाडीची धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिलाय, असं म्हणणं चुकीचं आहे. शरद पवारांनी माझ्या वडिलांबाबत केलेलं विधान दुर्दैवी असून जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहबे. पवारांनी अशा प्रकारे टिप्पणी करायला नको होती. मुलानं केलेल्या भाजप प्रवेशावर मी उत्तर हायकमांडला देईन.तसेच अहमदनगरमध्ये मी कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. सुजयचा भाजप प्रवेशाचा निर्णय वैयक्तिक होता. अशा शब्दात विखे - पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ajit pawar
First Published: Mar 15, 2019 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...