दुर्गम मेळघाटात सुनिल शेट्टींचा नवनीत राणांसाठी रोड शो

दुर्गम मेळघाटात सुनिल शेट्टींचा नवनीत राणांसाठी रोड शो

'जो व्यक्ती लोकांच्या विकासासाठी झटतो, ज्या उमेदवाराची विजयी होण्याची मला खात्री असते त्याच्याच प्रचारासाठी मी जात असतो.'

  • Share this:

संजय शेंडे अमरावती, 11 एप्रिल : अमरावती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी यांनी मेळघाटातील धारणी येथे रोड शो केला. अमरावती लोकसभा मतदारसंघात अतिशय दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेला मेळघाटात हा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवारांसाठी नेहमीच निर्णायक ठरतो.

जो व्यक्ती लोकांच्या विकासासाठी झटतो, ज्या उमेदवाराची विजयी होण्याची मला खात्री असते त्याच्याच प्रचारासाठी मी जात असतो म्हणून या वेळी मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी नवनीत राणा यांना खासदार म्हणून निवडून द्या असे आव्हान सुनिल शेट्टी यांनी केले. सुनील शेट्टी यांनी सकाळी चिखलदरा, सेमाडोह, धारणी व चुरणी येथे सुद्धा रोड शो केला.

मेळघाटातील अनेक प्रश्न शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सोडविले नसून आदिवासींचे वीज,पाणी,रस्ते, कुपोषण, पुनर्वसन या सारखे मूलभूत प्रश्न  सोडविण्यासाठी नवनीत राणा प्रयत्न करतील असं शेट्टी म्हणाले.

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीचं नातं आहे. कुठल्याही अडचणीच्या काळात ते मदतीसाठी तत्पर असतात असंही सुनिल शेट्टींनी सांगितलं.

तीन महिला देत आहेत युतीला टक्कर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज आहिर आणि शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात नरेंद्र मोदींनी पहिली प्रचारसभा घेतली. त्याच विदर्भातून 3 स्त्रिया भाजपची वाट बिकट करू शकतात.

चारुलता टोकस, नवनीत राणा आणि वैशाली येडे या तीन महिला उमेदवार भाजपची मतं कमी करू शकतात, असं बोललं जात आहे. तिघीही वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, हे विशेष.

वैशाली येडे हे नाव या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळं म्हणून पुढे आलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून वैशाली येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी लढा उभारला. मराठी साहित्य संमेलनात आयत्या वेळी वैशाली येडे यांना निमंत्रण देण्यात आलं आणि त्यांनी नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यावरून वादंग उठला असताना वैशाली येडे यांनी त्यांच्या जागी भाषण केलं आणि ते गाजलं. शेतकऱ्याच्या पत्नीचं मनोगत अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरलं. तेव्हापासून वैशाली यांचं नाव महाराष्ट्रात गाजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या